Mary Kom e sakal
क्रीडा

बॉक्सिंग टीमला घेऊन जाणाऱ्या विमानातील इंधन संपले, अन्...

विमानाला जवळपास अर्धा तास लँडिंगसाठी प्रतिक्षा करावी लागली.

सुशांत जाधव

भारतीय बॉक्सिंग टीमसह उड्डान भरलेल्या विमानाची दुबई विमानतळावर आपातकालीन लँडिंग करण्यात आलीये. या विमानात स्टार महिला बॉक्सर मेरीकोमसह अन्य प्रमुख बॉक्सर होते. दिल्लीहून दुबईत दाखल झालेल्या विमानाला लँडिंगसाठी प्रतिक्षा करावी लागली. इंधन कमी झाल्यानंतर आपतकालीन लँडिंग करण्याची वेळ आली, अशी माहिती समोर येत आहे. विमानाला जवळपास अर्धा तास लँडिंगसाठी प्रतिक्षा करावी लागली. भारतीय बॉक्सिंग टीमच्या दौऱ्यासंदर्भात संभ्रम असल्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. मात्र भारतीय बॉक्सिंग महासंघाने यावर भाष्य करणे टाळले आहे.

SpiceJet चे हे विमान भारतीय बॉक्सिंग संघातील खेळाडूंना दिल्लीहून दुबईला घेऊन चालले होते. लँडिंगला परवानगी न मिळाल्याने त्यांना अर्धातास प्रतिक्षा करावी लागली. स्पाइसजेटने एक निवेदन जारी केले असून भारतीय बॉक्सिंग टीममधील सर्व खेळाडू सुखरुप असून दुबईत हॉटेलमध्ये ते पोहचल्याची माहिती दिली आहे. सर्व खेळाडूंकडे आवश्यक ते दस्ताऐवज होते. एअर बबलच्या अंतर्गत हे उड्डान करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

भारतीय बॉक्सिंग महासंघाने देखील याप्रकरणानंतर निवेदन जारी करत युएईतील भारतीय दुतावासाचे आभार मानले आहेत. विमान लँडिंगसाठी नेमका उशीर का झाला? याचे स्पष्टीकरण मात्र भारतीय बॉक्सिंग संघाने दिलेले नाही. या निवेदनानुसार 'भारतीय बॉक्सर्संना घेऊन जाणारे विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. विमानतळावरील आरटी-पीसीआर टेस्ट नंतर हॉटेलमध्येही खेळाडूंची चाचणी झाली. सर्व खेळाडू स्पाइसजेटच्या जैवसुरक्षित वातावरणात दुबईमध्ये दाखल झाले होते. भारतीय दुतवास आणि आशियाई बॉक्सिंग महासंघासह युएई सरकारचेही त्यांनी आभार मानले आहेत.

आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय बॉक्सर दुबईला पोहटले आहेत. ही स्पर्धा भारतात होणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ही स्पर्धा युएईमध्ये पार पडणार आहे. पुरुष आणि महिला अशा वेगवेगळ्या गटातील या स्पर्धेला 24 मे पासून सुरुवात होणार आहे.

भारतीय पुरुष बॉक्सिंग टीम

विनोद तंवर (49 किग्रा), अमित पंघाल (52 किग्रा), मोहम्मद हुसामुद्दीन (56 किग्रा), वरिंदर सिंह (60 किग्रा), शिव थापा (64 किग्रा), विकास कृष्ण (69 किग्रा), आशीष कुमार (75 किग्रा), सुमित सांगवान (81 किग्रा), संजीत (91 किग्रा) आणि नरेंदर (91 किग्रापेक्षा अधिक).

महिला बॉक्सिंग संघ:

मोनिका (48 किग्रा), एमसी मेरीकोम (51 किग्रा), साक्षी (54 किग्रा), जास्मिन (57 किग्रा), सिमरनजीत कौर (60 किग्रा), लालबुआतसाही (64 किग्रा), लवलीना बोरगोहेन (69 किग्रा), पूजा रानी (75 किग्रा), स्वीटी (81 किग्रा) आणि अनुपमा (81 किग्रापेक्षा अधिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT