R Praggnanandhaa Anurag Thakur esakal
क्रीडा

R Praggnanandhaa : प्रग्नानंदची पाठ थोपटताना क्रीडामंत्र्यांनी चेस ऑलिम्पियाडच्या 'यशस्वी' आयोजनाचीही करून दिली आठवण

अनिरुद्ध संकपाळ

R Praggnanandhaa : भारताचा युवा बुद्धीबळपटू आर. प्रग्नानंदने अझरबैजानमधील बाकू येथे झालेल्या बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. त्याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बुद्धीबळपटूंचा पराभव केला. तर अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला रॅपिड फेरीपर्यंत झुंजवले.

देशभरातून 18 वर्षाच्या प्रग्नानंदवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच आता केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील प्रग्नानंदची पाठ थोपटली. प्रग्नानंदने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील प्रग्नानंदचा गौरव केला. (Sports Minister Anurag Thakur Congratulate R Praggnanandhaa)

या गौरवानंतर प्रग्नानंद एएनआयशी प्रतिक्रिया देताना म्हणाला, 'आम्हाला इतका पाठिंबा मिळतोय हे पाहून खूप आनंद झाला आहे. यामुळे अजून कष्ट करून चांगली कामगिरी देशाला किर्ती मिळवून देण्यासाठी प्रेरणा मिळते.'

दरम्यान, प्रग्नानंदचा गौरव करताना केंद्री क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, 'मी त्याचे अभिनंदन केले. त्याने भारताचा गौरव वाढवला. अवघ्या 16 व्या वर्षी जे इतर कोणाला जमणार नाही ते त्याने करून दाखवलं. त्याने अनेक युवकांना बुद्धीबळ खेळण्यासाठी प्रेरित देखील केलं आहे. बुद्धीबळाची सुरूवात भारतात झाली मात्र भारतात चेस ऑलिम्पियाड आयोजित करण्यासाठी शेकडो वर्षे लागली. आम्ही ते यशस्वीरित्या आयोजित करून दाखवलं.'

प्रग्नानंदने पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील भेट घेतली होती. त्यावेळी ट्विटरवरून त्याने पंतप्रधानांचे आभार देखील मानले होते. त्याने ट्विट केले की, 'पंतप्रधानांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्याची संधी मिळणे हा खूप मोठा गौरव आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला प्रोत्साहित केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duplicate Voter Detection : राज्य निवडणूक आयोग संभाव्य दुबार मतदार कशाच्या आधारावर ठरवणार?

Ahmadpur Crime : अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात पिता पुत्राचा अज्ञात हल्लेखोरांकडून निर्घुन खून

Maharashtra Police : श्रीशैल्य चिवडशेट्टी बारामतीचे नवीन पोलिस निरिक्षक

Eknath Khadse : खडसेंच्या मुक्ताई बंगल्यातील चोरीचा पर्दाफाश! आंतरराज्यीय टोळीचा सहभाग, सोने घेणारा सराफ अटकेत

निशिगंधा वाड यांची लेक अभिनय क्षेत्रात येणार? दीपक देऊळकर म्हणाले, 'माझी मुलगी गोल्ड मेडलिस्ट पण...

SCROLL FOR NEXT