क्रीडा

ब्राझीलचा ‘वंडरकिड’ व्हिनिसियस ठरणार आकर्षण!

किशोर पेटकर

व्हिनिसियस ज्युनिअरविषयी...

पूर्ण नाव - व्हिनिसियस जुझे पाशाव द ऑलिव्हेरा ज्युनिअर
जन्मतारीख - १२ जुलै २००० 
क्‍लब - फ्लेमेंगो (ब्राझील), रियाल माद्रिद 
(१२ जुलै २०१८ पासून)

पणजी - भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील संभाव्य विजेता असेल. या संघात ‘वंडरकिड’ व्हिनिसियस ज्युनिअर याचा समावेश आहे. सतरा वर्षीय स्ट्रायकर भावी सुपरस्टार मानला जातो. गतवर्षी ऑक्‍टोबरमध्ये गोव्यात झालेल्या पहिल्या ब्रिक्‍स कप फुटबॉल स्पर्धेत त्याने भाग घेतला व चार गोलही केले होते. 

व्हिनिसियस हा ब्राझीलमधील अव्वल साखळीतील फ्लेमेंगो संघाशी करारबद्ध आहे. या क्‍लबच्या सीनियर संघातून त्याने या वर्षी १३ मे २०१७ रोजी पदार्पण केले. त्याचे व्यावसायिक हक्क बलाढ्य स्पॅनिश संघ रियाल माद्रिदने मिळविले आहेत. अठराव्या वाढदिवसानंतर (१२ जुलै २०१८) तो स्पॅनिश संघाकडे ४५ दशलक्ष युरोंच्या मोबदल्यात असेल. आंतरराष्ट्रीय ‘ट्रान्स्फर’साठी १८ वर्षे पूर्ण होणे बंधनकारक असते. भारतातील १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळणारा तो सर्वाधिक महागडा फुटबॉलपटू असेल. 

प्रेक्षणीय गोल!
गतवर्षी ब्रिक्‍स कप १७ वर्षांखालील स्पर्धेत व्हिनिसियस ब्राझीलसाठी हुकमी एक्का होता. बांबोळी येथील ॲथलेटिक्‍स स्टेडियमवर झालेल्या साखळी फेरीत त्याने तीन गोल केले होते, तर फातोर्डा-मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम लढतीत एक गोल केला होता. ही स्पर्धा ब्राझीलनेच जिंकली होती. बांबोळी येथे त्याने साखळी फेरीत रशिया, दक्षिण आफ्रिका व भारताविरुद्ध प्रत्येकी एक गोल केला होता. अंतिम लढतीत १५ ऑक्‍टोबर २०१६ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ३५व्या मिनिटास ३० यार्डावरून सणसणीत फटक्‍यावर केलेला गोल प्रेक्षणीय होता. व्हिनिसियसने यावर्षी मार्चमध्ये झालेल्या दक्षिण अमेरिकन १७ वर्षांखालील स्पर्धेत विजेत्या ब्राझीलसाठी सात गोल केले होते व स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार त्यालाच मिळाला होता.

दुसऱ्यांदा गोव्यात!
विश्‍वकरंडक स्पर्धेत ब्राझीलचा ‘ड’ गटात समावेश आहे. दक्षिण कोरिया, नायजर व स्पेन हे गटातील अन्य संघ आहेत. गटातील पाच सामने कोची येथे खेळले जातील, तर नायजर व ब्राझील यांच्यातील एक सामना १३ ऑक्‍टोबरला फातोर्डा-मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होईल. त्यावेळी व्हिनिसियस पुन्हा गोव्यात खेळू शकेल.

गोवा शहर बोधचिन्हाचे अनावरण एक सप्टेंबरला झाले. त्यावेळी स्पर्धेच्या स्थानिक आयोजन समितीचे (एलओसी) स्पर्धा संचालक हावियर सेप्पी यांनी १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेचे महत्त्व विशद केले होते. ही स्पर्धा म्हणजे भावी सुपरस्टार घडविणारे व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले होते. ब्राझीलचा सध्याचा सर्वांत महागडा स्ट्रायकर नेमार ज्युनियर याचे त्यांनी उदाहरण दिले होते. संभाव्य सुपरस्टार बनू शकणाऱ्या युवा फुटबॉलपटूंना प्रत्यक्ष मैदानावर खेळताना पाहण्याचे भाग्य भारतीयांना लाभेल असे ते म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT