Sri Lanka Announce Squad For India T20Is 
क्रीडा

INDvsSL : भारतात खेळायचं म्हणून 18 महिन्यानंतर त्याला घेतलं संघात

वृत्तसंस्था

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच जानेवारीपासून होणाऱ्या टी20 मालिकेसाठी आज श्रीलंकेने 16 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. या मालिकेतून  अॅंजेलो मॅथ्यूज पुनरागमन करत आहे. या मालिकेसाठी संघाचे नेतृत्त्व लसिथ मलिंगा करणार आहे. 

मॅथ्यूजसोबतच धनंजया डी सिल्व्हाचे संघात पुनमरागमन झाले आहे. नुवान प्रदीपच्या अनुपस्थितीमुळे वेगवान गोलंदाजीची धुरा पुन्हा लसिथ मलिंगावरच आहे. घोट्याला दुखापत झाल्यामुळे नुवानला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

गोलंदाजीमध्ये मलिंगासोबत लाहीरु कुमारा आणि इसुरु उडाना हे दोन वेगवान गोलंदाज आहेत. स्पिनर म्हणून संघात वानिंडू हसारंगा, लक्षण संदाकन आणि धनंजया डी सिल्व्हा यांचा समावेश केला गेला आहे. 

18 महिने संघाबाहेर
दुखापतीमुळे मॅथ्यूजला गेल्या अनेक टी20 सामन्यांमधून माघार घ्यावी लागली होती.  त्याने गेल्या वर्षभरात एकही टी20 सामना खेळलेला नाही. त्याने ऑगस्ट 2018मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा टी20 सामना खेळला होता. तब्बल 18 महिन्यांनंतर तो संघात पुनरागमन करत आहे.  

मलिंगासाठी विजयाचा दुष्काळ 
मलिंगाने 2019पासून श्रीलंकेच्या संघाने नेतृत्त्व करण्यास सुरवात केली मात्र, गेल्यावर्षात त्याला पराभवाचाच सामना करावा लागला आहे. त्या नेतृत्त्वात श्रीलंकेने 2019 मध्ये नऊ सामने गमावले आहेत तर केवळ एका सामन्यात विजय मिळवला आहे. 

श्रीलंकेचा संघ : लसिथ मलिंगा (कर्णधार), कुसल परेरा, धनुष्का गुनतिलका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्ष, ओशादा फर्नांडो, दासून शानाका, निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस, वानिंडू हसारंगा, लक्षण संदाकन, धनंजया डी सिल्व्हा, लाहीरु कुमारा, इसुरु उडाना आणि कासून राजिता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final: टीम इंडियावर ४ मोठे ‘शाप’; न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलून भारत ट्रॉफी जिंकणार का?

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

Latest Marathi News Live Update : खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...

UPSC Result : वैभव सूर्यवंशीचे मामा होणार IPS, १०२ व्या रँकसह उत्तीर्ण केली UPSC परीक्षा

मोठी बातमी! इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी नवे नियम लागू; महायुती सरकारने वयाची अट बदलली, आता किती वर्षाच्या मुलांना प्रवेश मिळणार?

SCROLL FOR NEXT