Sri Lanka Appoint Dhananjaya de Silva As Test Captain Replacing Dimuth Karunaratne cricket news in marathi  
क्रीडा

कसोटीचाही कर्णधार बदलला! आता 'हा' खेळाडू सांभाळणार संघाची कमान

Kiran Mahanavar

Sri Lanka Appoint Dhananjaya de Silva As Test Captain : श्रीलंका क्रिकेट संघाने कसोटीत नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. श्रीलंका क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता उपुल थरंगा यांनी पुष्टी केली आहे की, धनंजय डी सिल्वा दिमुथ करुणारत्नेच्या जागी त्यांचा कसोटी कर्णधार असेल. डी सिल्वा कसोटीत श्रीलंकन ​​संघाचे नेतृत्व करणारा आपल्या देशाचा 18वा खेळाडू ठरणार आहे.

करुणारत्नेच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या संघाने एकूण 30 कसोटी सामने खेळले, त्यापैकी 12 जिंकले आणि 12 गमावले, याशिवाय 6 कसोटी सामने अनिर्णित राहिले. करुणारत्नेच्या नेतृत्वाखाली 2019 च्या सुरुवातीला श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत पराभूत केले, त्यानंतर ही कामगिरी करणारा तो आशियातील पहिला संघ ठरला.

2019 मध्ये जेव्हा श्रीलंकेचे क्रिकेट खूप चढ-उतारांमधून जात होते, तेव्हा कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिमुथ करुणारत्नेकडे देण्यात आली होती. यानंतर संघाच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण बदलले असताना करुणारत्ने फलंदाज म्हणून अधिक जबाबदारीने खेळताना दिसला.

या काळात श्रीलंकेच्या संघाने काही सामने जिंकले, तर काही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. असे असतानाही करुणारत्नेने सर्व खेळाडू आणि निवडकर्त्यांचा विश्वास कायम त्यांच्यावर होता.

दिमुथ करुणारत्नेच्या जागी कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलेला धनंजय डी सिल्वा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये प्रथमच संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.

धनंजयने आतापर्यंत 51 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 91 डावांमध्ये 38.84 च्या सरासरीने 3301 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश होता. धनंजय 6 फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या एक सामन्याच्या कसोटी मालिकेत कसोटी कर्णधार म्हणून खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT