Asia Cup 2022 Sri Lanka vs Afghanistan kgm00  sakal
क्रीडा

Asia Cup : लंका ग्रुप स्टेज मधील पराभवाचा बदला सुपर-4 मध्ये घेणार का?

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अफगाणचे पारडे जड; सुपर-४ फेरीचा आज सामना

Kiran Mahanavar

Asia Cup 2022 Sri Lanka vs Afghanistan : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत सलामीला झालेला अफगाणिस्तान-श्रीलंका हा सामना सुपर- ४ मध्येही सलामीला होत आहे. त्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात श्रीलंका संघ बॅकफूटवरच असेल.

अफगाणिस्तानला टी-२० या प्रकारात कोणीही कमी लेखत नाही. कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. श्रीलंका आणि बांगलादेशला पराभूत करून त्यांनी आपली ताकद याआधीच दाखवलेली आहे.

श्रीलंकेने काल झालेल्या सामन्यात बांगलादेशवर निसटता विजय मिळवत सुपर-४ मध्ये स्थान मिळवले. बांगलादेशने केलेल्या चुकांचा फायदा त्यांना मिळाला होता. तशा चुका अफगाणिस्तान करणार नाही. त्यामुळे त्यांन सावधच राहावे लागेल.

दुबईची खेळपट्टी वेगवेगळे रंग दाखवत असली, तरी अफगाणिस्तानकडे असलेले मुजीब उर रहमान आणि रशिद खान कोणत्याही परिस्थितीत धोकादायक ठरू शकतात. नव्या चेंडूवर फारूकीने कमाल दाखवलेली आहे. श्रीलंकेकडे वानिंदू हसरंगा आणि चमिका करुणारत्न असे फिरकी गोलंदाज आहेत. बांगलादेशविरुद्ध त्यांनी दोन-दोन विकेट मिळवल्या होत्या; तरीही बांगला फलंदाजांनी १८३ अशी धावसंख्या उभारली होती. बांगलादेशला षटकांची गती न राखल्याचा फटका बसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: रोज 3 तास ट्रॅफिकमध्ये अडकायचा! आज वडापाव विकून कमावतो लाखो रुपये; मराठी तरुणाने कसा उभारला व्यवसाय?

Pune Crime: लोणी काळभोर हादरले! उघड्या चारीत पडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारावर पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : गोसीखुर्द धरणाचे ३ दरवाजे उघडले; वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Pune Fire News: वेल्डिंगच्या ठिणग्यांनी घेतला रौद्ररूप; मांजरीत दोन दुकाने आगीत खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

Mumbai News: तापामुळे रुग्णालयात दाखल; सकाळी ठाकरे गटाच्या ३२ वर्षीय नेत्याचा संशयास्पद मृत्यू, तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं

SCROLL FOR NEXT