sri lanka captain dasun shanaka goes unsold in ipl 2023 auction 
क्रीडा

IND vs Sl: लंकेचा कर्णधार शनाका 'गोरा असता तर IPL मध्ये पडला असता पैशांचा पाऊस'

टीम इंडियाविरुद्ध तांडव करणारा दासून शनाका आयपीएलमध्ये गेला नाही विकल्या...

Kiran Mahanavar

India vs Sri lanka T-20 Series : श्रीलंकेने भारताविरुद्धचा दुसरा टी-20 सामना 16 धावांनी जिंकला. या विजयासह तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार दासून शनाका श्रीलंकेच्या विजयाचा हिरो ठरला. शनाकाने प्रथम फलंदाजी करताना तुफानी खेळी केली. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल अवघ्या 22 चेंडूत 56 धावा करणाऱ्या या खेळाडूला आयपीएलमध्ये कोणीही विकत घेतले नाही. (Sri lanka Captain Dasun Shanaka Goes Unsold in IPL 2023 Auction)

दासुन शनाका या IPL लिलावात अनसोल्ड राहिला. दासून शनाकाचे नाव डेव्हिड किंवा डॅनियल शनाका असते किंवा तो श्रीलंकेऐवजी इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाहून आला असता तर कदाचित जोरदार बोली लागली असती. दासुन शनाका हा उत्कृष्ट खेळाडू, वेगवान गोलंदाजी अष्टपैलू तसेच कर्णधारपदाचा पर्याय आहे. पण कदाचित प्रतिभावान असूनही गोर्‍या खेळाडूंवर मोहित झालेल्या फ्रँचायझींनी 50 लाखांच्या मूळ किमतीतही त्यांना विकत घेणे आवश्यक मानले नाही.

फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, दासुन शनाकाने 22 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या, ज्यात सहा षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. शनाकाच्या सहा पैकी तीन षटकार शिवम मावीच्या षटकात आले. शनाकाने अवघ्या 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजाचे सर्वात जलद अर्धशतक आहे. यापूर्वी कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी 21 चेंडूत अर्धशतके पूर्ण केली होती.

भारताविरुद्धच्या शेवटच्या 5 टी-20 मध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड

दासुन शनाकाने भारताविरुद्धच्या शेवटच्या 5 टी-20 सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने 205.64 च्या स्ट्राईक रेटने 255 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. दोनदा 40 पेक्षा जास्त धावा केल्या आणि एकदा 30 पेक्षा जास्त. टी-20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 84 सामन्यात 21.39 च्या सरासरीने आणि 121.62 च्या स्ट्राईक रेटने 1305 धावा केल्या आहेत. 8.04 च्या इकॉनॉमीसह 39 विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By-Election : मोठी बातमी ! बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, मल्लिकार्जून खर्गेंचे शरद पवार यांना आश्वासन

Shevta Mahadev Temple : जायकवाडी धरणाच्या लाटांखाली 54 वर्षे हरवलेला वारसा पुन्हा जिवंत होणार; शेवता ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय, 'हेमाडपंथी' वैभव परतणार!

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार; पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून नागरिक हैराण

Satara News : ‘स्थानिक स्वराज्य’मध्ये महायुतीची कसोटी; सातारा- सांगली विधान परिषदेसाठी नव्या समीकरणांची नांदी; झेडपी निवडणुकीनंतर बदलली गणिते?

IPL 2026: फक्त १ धावेने सामना जिंकल्यानंतर शुभमन गिलला BCCI ने सुनावली शिक्षा; DC vs GT सामन्यात काय झाली चूक?

SCROLL FOR NEXT