Danushka Gunathilaka sakal
क्रीडा

Danushka Gunathilaka : श्रीलंकन क्रिकेटचा मोठा निर्णय! बलात्कार प्रकरणी 'या' खेळाडूची संघातून हकालपट्टी

दानुष्का गुनाथिलकाला 6 नोव्हेंबरला सिडनी मध्ये बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

सकाळ ऑनलाईन टीम

Danushka Gunathilaka : श्रीलंकेच्या क्रिकेट संघासाठी टी-20 विश्वचषक 2022 दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हता. संघ उपांत्य फेरीसाठीही पात्र ठरू शकला नाही. मात्र डावखुरा फलंदाज दानुष्का गुनाथिलका संघासह श्रीलंकेला परतला नाही तेव्हा आणखी एक वाईट बातमी आली. दानुष्का गुनाथिलकाला 6 नोव्हेंबरला सिडनी मध्ये बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

दानुष्काच्या अटकेमुळे श्रीलंका क्रिकेटचीही बरीच बदनामी होत आहे, मात्र याच दरम्यान 24 तासांनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेत गुनाथिलकाला सर्व फॉरमॅटमधून निलंबित केले आहे. श्रीलंका क्रिकेटने सोमवारी याची पुष्टी केली की, देशाच्या क्रिकेट बोर्ड यूएसच्या कार्यकारी समितीने राष्ट्रीय खेळाडू दनुष्का गुनाथिलकाला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टार फलंदाजाला लैंगिक आरोपांप्रकरणी अटक केल्यानंतर तिच्या निवडीसाठी विचार न करण्याचा निर्णय घेतला जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या तक्रारीवरून दनुष्का गुनाथिलकाला अटक करण्यात आली आहे. 31 वर्षीय क्रिकेट स्टारला रविवारी पहाटे 1 वाजता सिडनीच्या पूर्वेकडील ससेक्स स्ट्रीट येथील हॉटेलमध्ये गेल्या आठवड्यात एका कथित घटनेच्या संदर्भात त्याला अटक करण्यात आली आहे. 29 वर्षीय महिलेने आरोप केला आहे की, गुणथिलकाने घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार आहे. ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, पोलिसांनी आरोप केला आहे की या महिलेने ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे अनेक दिवस दनुष्का गुनाथिलकाशी चॅट केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT