sri lanka in crisis cricketer sanath jayasuriya thanks india to help 
क्रीडा

भारताचे आभार मानून! जयसूर्या लागलाय लंकेचा राष्ट्रपती होण्याच्या तयारीत?

जयसूर्या कोलंबोतील राष्ट्रपती कार्यालयाबाहेर निदर्शने करत राष्ट्रपती राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत लोकांमध्ये उभे होते

सकाळ ऑनलाईन टीम

Sri Lanka Crisis: भारताचा शेजारी देश श्रीलंकेतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. श्रीलंकेतील परिस्थिती सातत्याने बिघडत आहे. माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या लोकांच्या पाठीशी उभा आहे. त्याने संकटकाळात भारताने मदतीचा हात पुढे केल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. (sri lanka in crisis cricketer sanath jayasuriya thanks india to help)

सनथ जयसूर्या यांनी एएनआयला सांगितले की, मला वाटते की सर्व देश श्रीलंकेत काय घडत आहे याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. श्रीलंकेत एकदा स्थिर सरकार स्थापन झाल्यानंतर, भारत आणि आमचे सर्व मित्र देश आम्हाला नक्कीच मदत करतील. या संकटाच्या सुरुवातीपासूनच भारत आम्हाला मदत करत आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. श्रीलंकेच्या संकटात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सनथ जयसूर्या भारताचे आभार मानून लंकेचा राष्ट्रपती होण्याच्या तयारी करत आहे. इतरांच्या तुलनेत या आंदोलनात सूर्या जास्तच ॲक्टिव दिसत आहे त्यामुळे अशा चर्चांना जोर आला आहे.

याआधी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले होते की, श्रीलंकेवर काय चालले आहे याची त्यांना जाणीव आहे. संकटकाळात भारत श्रीलंकेला शक्य ती सर्व मदत करेल. या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही श्रीलंकेच्या लोकांसोबत उभे आहोत. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला भारताने US$ 3.8 बिलियनची तात्काळ मदत केली. एवढेच नाही तर भारत श्रीलंकेला प्रथम शेजारी या धोरणांतर्गत भविष्यातही मदत करत राहील.

सनथ जयसूर्याचे यापूर्वी काही फोटो समोर आले होते, ज्यामध्ये तो कोलंबोतील राष्ट्रपती कार्यालयाबाहेर निदर्शने करत राष्ट्रपती राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत लोकांमध्ये उभे होते. जयसूर्या हा गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रपती राजपक्षे यांच्याकडे आपल्या पदावरून पायउतार व्हावेत अशी मागणी करत आहेत. याबाबत त्यांनी अनेक ट्विटही केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation: दिल्लीत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; महिला आरक्षण आणि फेररचना विधेयके अधिवेशनात मंजूर होणार, अमित शहांच्या भेटीनंतर मोठे विधान

Sonam Wangchuk Protest : 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही'; सोनम वांगचुक यांचे सरकारला थेट आव्हान, २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चासाठी जनतेला आवाहन

Latest Marathi News Live Update : युनियन जिमखाना क्लबमध्ये गोळीबार; पूर्ववैमनस्यातून जालगारवर हल्ला, कॅम्प ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे

Maharashtra farmer: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे ₹48 हजार कोटींचे वीजबिल माफ; वर्षाअखेरीस 12 तास मोफत दिवसा वीज, कर्जमाफीनंतर आणखी दिलासा

Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र- मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT