Sri Lanka's quest for direct Cricket odi World Cup qualification 2023 takes a hit after point loss cricket news in marathi kgm00  esakal
क्रीडा

Sri Lanka ODI WC: पावसामुळे श्रीलंकेच्या स्वप्नांना धक्का! 2023च्या एकदिवसीय वर्ल्डकपमधून बाहेर

श्रीलंकेच्या वर्ल्डकप पात्रता मोहिमेत पावसाचा अडथळा

सकाळ ऑनलाईन टीम

ODI World Cup qualification 2023 : श्रीलंकेच्या एकदिवसीय विश्वकरंडकात थेट पात्र होण्याच्या स्वप्नांना धक्का बसला आहे. यंदाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धचा एकदिवसीय (ता. २८) सामना पावसामुळे एकही चेंडू न खेळवण्यात आल्याने रद्द करण्यात आला, त्यामुळे श्रीलंकेच्या विश्वकरंडकात थेट पात्र होण्याच्या स्वप्नांना धक्का बसला आहे.

ख्राईस्टचर्चमधील आजचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना सुपर लीग स्पर्धेमध्ये प्रत्येकी पाच-पाच गुण देण्यात आले आहेत; मात्र याचा फटका श्रीलंकेच्या संघाला बसला आहे. त्यांना पाचच गुण मिळाले असल्याने ते ८२ गुणांसह नवव्या स्थानावर आहेत. भारतात होणाऱ्या विश्वकरंडकात थेट पात्रता मिळवण्यासाठी त्यांच्या हातात आता एकच सामना उरला आहे. न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना हॅमिल्टनमध्ये होणार आहे. यात विजय संपादन करणे श्रीलंकेसाठी आवश्यक असणार आहे;

मात्र असे असले तरी विश्वकरंडक स्पर्धेत थेट पात्र होण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला आता दक्षिण आफ्रिकेच्या नेदरलँडविरुद्धच्या मालिकेवर अवलंबून राहावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेने या नेदरलँडविरुद्धच्या दोन एकदिवसीय मालकेमध्ये २-० असा विजय मिळवल्यास ते सुपर लीगच्या गुणतक्त्यात आठव्या स्थानावर जाणार आहेत.

न्यूझीलंडचा संघ या सुपर लीगच्या गुणतक्त्यात १६५ गुणांसह प्रथम स्थानावर आहे. भारतात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेमध्ये थेट आठ संघ पात्र ठरणार आहेत. त्यापैकी पहिल्या सात संघांची नावे निश्चित झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pulwama attack: पुलवामा हल्ल्यासाठी ऑनलाईन स्फोटके खरेदी केले; FATF चा धक्कादायक खुलासा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना पोर्टल बंद, नव्याने पात्र महिला लाभापासून वंचित

Latest Maharashtra News Updates : आझाद मैदान मध्ये शिक्षकांचा आंदोलन, रोहित पवारांचा पाठिंबा

Narayangaon Crime : बनावट नवरी मुलीसह सात जणांची टोळी जेरबंद; सहा ते सात अविवाहित तरुणांची केली फसवणूक

Bike Taxi Service Ban: रॅपिडो बाईक टॅक्सी अखेर बंद, सर्वांचे लक्ष सरकारच्या 'ई-टॅक्सी'कडे

SCROLL FOR NEXT