Sri Lanka vs India
Sri Lanka vs India  Twitter
क्रीडा

SLvsIND : धनंजया डी सिल्वाचा जलवा; लंकेनं केला विजयाचा 'कालवा'

सुशांत जाधव

Sri Lanka vs India 2nd T20I : धनंजया डी सिल्वाच्या नाबाद 40 धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेनं दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला 4 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यातील विजयासह श्रीलंकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. सलामीवीर भानूकाने उपयुक्त 36 धावांची खेळी केली. तळाच्या फलंदाजीत चमीरा करुनारत्ने याने 6 चेंडूत नाबाद 12 धावांची खेळी करत धनंजया डी सिल्वावाला उत्तम साथ दिली. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 2 तर भुवी, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, चेतन सकारिया आणि राहुल चाहर यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. (Sri Lanka vs India 2nd T20I Rescheduled match Sri Lanka won by 4 wkts And series 1-1 level)

भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. धावफलकावर अवघ्या 12 धावा असताना भुवनेश्वरने अविष्का फर्नांडोच्या रुपात टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. समरवीराविक्रमा 8 (12), कर्णधार दसुन शनाका 3(6) स्वस्तात माघारी परतल्यानंतर मिनोद भानूकाने 31 चेंडूत 36 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कुलदीप यादवने श्रीलंकेला चौथा धक्का दिला. राहुल चाहरने हसरंगाला 15 (11) बाद करत सामन्यात रंगत आणली.

श्रीकेचा कर्णधार दसुन शनाका याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अनुभवी शिखर धवनने युवा आणि पदार्पणातील सामना खेळणाऱ्या ऋतूराज गायकावडच्या साथीने भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. शनाकाने भारताची सलामीची जोडी फोडली. 21 धावांवर खेळणाऱ्या ऋतूराजचा भानूकाने कॅच पकडला. त्यानंतर धवनने युवा पदिक्कलसोबत 32 धावांची भागीदारी रचली. हंसरंगाने पदिक्कलला 29 धावांवर बाद केले. संजू सॅमसन अवघ्या 7 धावा करुन परतला. शिखर धवनच्या 40 धावा आणि अखेरच्या षटकात भुवीने केलेल्या 13 धावांच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 132 धावा केल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT