Sri Lanka vs Pakistan 2nd Test Lanka Set 508 runs Target In Front of Pakistan cricket
क्रीडा

SL vs PAK : लंकेचे पाकिस्तानसमोर ठेवले तब्बल 508 धावांचे आव्हान

अनिरुद्ध संकपाळ

Sri Lanka vs Pakistan 2nd Test : श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी तब्बल 508 धावांचे आव्हान ठेवले आहे. दुसऱ्या डावात धनंजया डि सिल्वाच्या (Dhananjaya de Silva) शतकी (109) खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानसमोर हे आव्हान ठवले. श्रीलंकेने आपला दुसरा डाव 8 बाद 360 धावांवर घोषित केला. आज श्रीलंकेच्या दिमुथ करूणारत्ने आणि धनंजया डि सिल्वा यांनी श्रीलंकेचा डाव 5 बाद 175 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. करूणारत्ने 61 धावा करून बाद झाला. तर सिल्वाने कसोटीतील आपले 9 वे शतक ठोकले. श्रीलंकेने पहिल्या डावात 378 धावा केल्या होत्या आणि पाकिस्तानला 231 धावात गुंडाळात पहिल्या डावात 147 धावांची आघाडी घेतली होती.

पाकिस्तान विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करत 378 धावा केल्या. यात श्रीलंकेकडून दिनेश चंदीमल सर्वाधिक 80 धावा केल्या. डिक्वेलाने 51 तर ओशादा फर्नांडोने 50 तर मॅथ्यूज आणि करूणारत्ने यांनी प्रत्येकी 42 आणि 40 धावा केल्या. पाकिस्तानकडून यासीर शाह आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

यानंतर लंकेने पाकिस्तानचा पहिला डाव 231 धावात संपुष्टात आणला. रमेश मेंडीसने भेदक मारा करत 5 विकेट घेतल्या तर प्रभात जयसूर्याने 3 विकेट घेतल्या. पाकिस्तानकडून आघा सलमानने सर्वाधिक 62 धावा केल्या. पहिल्या डावात 147 धावांची आघाडी घेतल्यानंतर श्रीलंकेने दुसरा डाव 8 बाद 260 धावांवर घोषित केला. लंकेकडून धनंजया डी सेल्वाने दमदार फलंदाजी करत 109 धावांची शतकी खेळी केली. त्याला करुणारत्नेने 61 तर रमेश मेंडीसने नाबाद 45 धावा करून चांगली साथ दिली.

आज सामन्याचा चौथा दिवस आहे. पाकिस्तानला विजयासाठी 508 धावांचे आव्हान पार करण्यासाठी आजच्या दिवसाचे एक सत्र आणि उद्याचा संपूर्ण दिवस मिळणार आहे. तरी देखील 508 धावांचे आव्हान श्रीलंकेत जवळपास अशक्यच दिसत आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरूद्धचा पहिला कसोटी सामना 4 विकेट्सनी जिंकत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली होती. दोन सामन्यांच्या मालिकेत लंकेला मालिका वाचवण्यासाठी दुसरा सामना जिंकणे महत्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT