SL vs AFG Cricket Player Marriage esakal
क्रीडा

SL vs AFG : वेळच नाही! लंकेच्या तीन खेळाडूने दोन सामन्यादरम्यानच उरकले लग्न

अनिरुद्ध संकपाळ

SL vs AFG Cricket Player Marriage : श्रीलंका आणि अफगाणिस्तान सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहेत. मालिकेतील दुसरा सामना अर्धा झालेला असताना पावसाचा व्यत्यय आला आणि सामना रद्द करावा लागला. या मालिकेतील तिसरा वनडे सामना 30 नोव्हेंबरला होणार आहे. याचदरम्यान, श्रीलंकेच्या तब्बल तीन क्रिकेटपटूंनी आपल्या लग्नाचा बार उडवून दिला. श्रीलंकेच्या कसुन राजिथा, चरिथ असलंका आणि पथुम निसंका यांनी कोलंबोमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लग्न केले. श्रीलंका क्रिकेट असोसिएशन तीनही खेळाडूंच्या लग्नाचे फोटो शेअर करत त्यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, रजिथाच्या लग्नातील एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिपमध्ये राजिथा आणि पत्नीने हिंदी गाणं देसी गर्लवर थरकत आहेत. या जोडप्याबरोबर संघसहकारी दिलशान मदुशंकाने देखील गाण्यावर ठेका धरला.

अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेत पथुम निसंकाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. दोन सामन्यात त्याने 88 धावा केल्या आहेत. निसंकाने पहिल्या वनडे सामन्यात 85 धावा केल्या होत्या. मात्र श्रीलंकेने हा सामना 60 धावांनी गमावला.

चरिथ असलंकाला पहिल्या दोन सामन्यात फारसा प्रभाव टाकता आलेला नाही. त्याने फक्त 10 धावा केल्या असून तिसऱ्या सामन्यात तो आपल्या संघासाठी मोठी खेळी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. कसुन राजिथाने पहिल्या दोन सामन्यात 4 विकेट्स घेत प्रभावी मारा केला. त्याने या मालिकेत 4.57 चा इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

Uruli Kanchan Crime : दारू पिण्यास पैसे न दिल्याने रागाचा उद्रेक; बिअरची बाटली डोक्यात मारून युवक जखमी; उरुळी कांचन घटना!

SCROLL FOR NEXT