steve smith angry at usman khawaja after run out australia vs sri lanka sports cricket 
क्रीडा

AUS vs SL: रन आऊट होताच स्टिव्ह स्मिथ ख्वाजावर भडकला

रन आऊट झाल्यावर स्मिथचा राग सातव्या आसमानावर

Kiran Mahanavar

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गाले (Galle City in Sri Lanka) येथे खेळवला जात आहे. बुधवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी चाहत्यांच्या नजरा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथवर होत्या. मात्र तो अवघ्या 6 धावा करून निरोशन डिकवेलाच्या थ्रोवर धावबाद झाला. (steve smith angry at usman khawaja after run out australia vs sri lanka)

स्टीव्ह स्मिथला श्रीलंकेविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही. 11 चेंडूत 6 धावा करून तो धावबाद झाला. डावाच्या 20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ही घटना घडली. ऑफ-स्पिनर रमेश मेंडिसने चेंडू टाकला. जो स्मिथच्या पॅडला लागून ऑफ-साइडला गेला. स्मिथने धाव घेण्याचे संकेत दिले. नॉन-स्ट्रायकरच्या एंडला उस्मान ख्वाजाने धावा घेण्यात रस दाखवला. मात्र काही अंतर धावल्यानंतर ख्वाजा यांनी धाव घेण्यास नकार दिला. तोपर्यंत स्मिथचा अर्धात आला होता.

अशा स्थितीत स्टीव्ह स्मिथ त्याच्या क्रीझमध्ये परत येऊ शकला नाही. रन आऊट झाल्यावर स्मिथचा राग सातव्या आसमानावर होता. त्याने ख्वाजाकडे हात उगारला. तो परत येण्याचे कारण विचारत होता. स्टीव्ह स्मिथची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. नॅथन लायनच्या 5 विकेट्सच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने यजमानांना पहिल्या डावात 212 धावांत गुंडाळले. कसोटी क्रिकेटमध्ये २० किंवा त्याहून अधिक वेळा ५ बळी घेणारा लायन आता ऑस्ट्रेलियाचा ५वा गोलंदाज ठरला आहे. या शानदार गोलंदाजीदरम्यान लायनने सर रिचर्ड हॅडली यांनाही सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मागे टाकले आहे. लायन आता 432 विकेट्ससह 12व्या स्थानावर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्वारीच्या कोठारात यंदा हरभरा-करडईची पेरणी! अतिवृष्टीमुळे मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना ५७० कोटींचा फटका; ऑक्टोबर उजाडला तरी नाही 'मालदंडी'ची पेरणी

Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला जाताय? तर चुकूनही विसरू नका 'या' 2 गोष्टी, नाहीतर स्वतःचं नुकसान करून घ्याल..!

आजचे राशिभविष्य - 07 ऑक्टोबर 2025

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT