Steve Smith Record sakal
क्रीडा

Steve Smith Record : स्मिथ नामक वादळ! सर डॉन ब्रॅडमन यांची बरोबरी तर आता रोहित रडारवर

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने एक खास विक्रम आपल्या नावावर केला

Kiran Mahanavar

Steve Smith Record : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत त्याने महान डॉन ब्रॅडमनची बरोबरी केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात स्मिथने कसोटी कारकिर्दीतील 29वे शतक झळकावले. यासह त्याने ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. स्मिथचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 41 वे शतक होते आणि आता त्याने या बाबतीत भारतीय कर्णधार रोहित शर्माची बरोबरी केली आहे.

रोहितने भारतासाठी आतापर्यंत 41 शतके झळकावली आहेत. त्याचवेळी स्मिथने त्याची बरोबरी केली असून या मालिकेत तो रोहित शर्माला मागे टाकण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत स्मिथ रोहितसोबत संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहे. या बाबतीत भारताचा विराट कोहली 71 शतकांसह पहिल्या, जो रूट आणि डेव्हिड वॉर्नर 44 शतकांसह संयुक्तपणे दुसऱ्या आणि रोहित-स्मिथ संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे.

स्मिथपेक्षा फक्त तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कसोटीत जास्त शतके झळकावली आहेत. यामध्ये रिकी पाँटिंग 41 शतकांसह पहिल्या, स्टीव्ह वॉ 32 शतकांसह दुसऱ्या आणि मॅथ्यू हेडन 30 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. स्मिथने आपल्या 29व्या कसोटी शतकासाठी 180 चेंडूंचा सामना केला. या सामन्यात त्याने मार्नस लबुशेनसोबत 251 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. सर्वात कमी डावात 29 कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या आधी भारताच्या सचिन तेंडुलकरचे नाव आहे, ज्याने 148 डावांमध्ये 29 वे कसोटी शतक झळकावले. त्याच वेळी, डॉन ब्रॅडमन या बाबतीत पहिल्या स्थानावर आहेत. त्याने 29 शतकांसाठी केवळ 79 डाव घेतले.

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात दुसऱ्या दिवशी दोन सत्रे खेळली गेली आहेत. वृत्त लिहिपर्यंत कांगारू संघने 598/4 वर डाव घोषित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT