sunil chhetri  twitter
क्रीडा

ISL : बंगळुरु FC ला सुनील छेत्रीवर अजूनही भरवसा!

2013 पासून सुनील छेत्री बंगळुरु FC कडून खेळताना पाहयला मिळते.

सुशांत जाधव

इंडियन सुपर लीग (ISL) स्पर्धेत बंगळुरु FC क्लबने भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीसोबत दोन वर्षांचा करार केला आहे. या करारामुळे 2023 पर्यंत सुनील छेत्री बंगळुरुच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. आगामी हंगामासाठी सुनील छेत्रीसोबत करारबद्ध झाल्याची माहिती क्लबकडून देण्यात आली आहे. 2013 पासून सुनील छेत्री बंगळुरु FC कडून खेळताना पाहयला मिळते. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत बंगळुरुकडून 203 सामन्यात त्याने आतापर्यंत 101 गोल डागले आहेत. (Sunil Chhetri Will Remain With Bengaluru FC-Till-2023)

36 वर्षीय सुनील छेत्री करारावरील हस्ताक्षरानंतर प्रतिक्रियाही दिली. तो म्हणाला की, आणखी दोन वर्षे बंगळुरुसोबत खेळणार असल्यामुळे आनंदी आहे. बंगळुरु क्लबचा संघ माझ्यासाठी घराप्रमाणे असून यातील प्रत्येक सदस्य कुटुंबियातील सदस्य आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया त्याने दिली. फुटबॉल क्लब, बंगळुरु शहर आणि चाहते यांच्यासोबत आणखी काही अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्याने बोलून दाखवले.

सहावेळा एआयएफएफ प्लेयर ऑफ ईयर पुरस्काराने सन्मानित सुनील छेत्रीच्या पदार्पणातच 2013 मध्ये बंगळुरु FC ने ISL चे पहिले वहिले जेतेपद पटकावले होते. सुनील छेत्रीच्या उपस्थितीत क्लबने आणखी पाच ट्रॉफ्या जिंकल्या आहेत. यात फेडरेशन कप (2015, 2017), इंडियन सुपर लीग (2018-19) आणि सुपर कप (2018) स्पर्धेचा समावेश आहे. सुनील छेत्रीने नुकताच एक खास विक्रम आपल्या नावे कला होता. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 76 गोल मारण्याचा पल्ला गाठला. या सामन्यात त्याने मेस्सीचा विक्रम मागे टाकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT