Sunil Gavaskar Birthday  esakal
क्रीडा

Sunil Gavaskar Birthday: 76 वर्षाचा तरूण... 'हा' कॅच पाहून काही तरूणांनाही लाज वाटेल, वाढदिवसाच्या शुभेच्छा गावसकर सर

Sunil Gavaskar celebrates 75th birthday: सुनील गावसकरांचा एक खास व्हिडिओ इरफान पठाणने शेअर केला होता.

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Gavaskar Birthday : भारताचे महान सलामीवीर सुनिल गावसकर हे आपला 76 व्या वाढदिवस साजरा करत आहेत. सुनिल गावसकर हे क्रिकेट इतिहासातील सर्वात पहिले सुपरस्टार क्रिकेटपटू आहेत. जरी ते आता वयाची 76 वर्षे पूर्ण करत असले तरी त्यांचा उत्साह हा एखाद्या तरूणाला लाजवेल असा आहे.

आपण सुनिल गावसकर यांचा क्रिकेटच्या मैदानावरील उत्साह हा वेळोवेळी पाहिला आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडिायवर व्हायरल होत असते. सध्या समालोचन कक्षात रमणाऱ्या सुनिल गावसकर यांचा तरूण सहकारी इरफान पठाणने (Irfan Pathan) गावसकरांचा एक व्हिडिओ शेअर दोन वर्षांपूर्वी शेअर केला होता.

इरफान पठाणने इन्स्टाग्रामवर त्याच्या मुलासोबतचा सुनिल गावसकरांचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत इरफानचा मुलगा आणि सुनिल गावसकर टेनिस बॉलने कॅचिंग प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. या व्हिडिओला इरफानने 'आमचे पहिले बॅटिंग लेजंड सुनिल गावसकर सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही कायम असेच फिट राहा. तुचे हे कॅचिंग पाहून एखादा युवा खेळाडू देखील लाजेल.'

इरफान पठाण बरोबरच अनेक आजी-माजी क्रिकटपटूंनी गावसकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सुनिल गावसकर हे मार्च 1987 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे पहिले क्रिकेटपटू ठरले होते. त्या काळात असा विक्रम करण्याचा कोणी विचार देखील केला नव्हता. सुनिल गावसकरांच्या काळात रेडिओवरून सामन्यांची रनिंग कॉमेंट्री केली जायची. त्यावेळी भारतातील चहते रेडिओला कान लावूनच बसत असतं.

वेस्ट इंडीजचे वेगवान गोलंदाज आपल्या बाऊन्स आणि वेगाने क्रिकेट जगतात थैमान घालत होते. त्यावेळी छोट्या देहयष्टीचे सुनिल गावसकर त्यांचा विना हेलमेट सामना करायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai IndiGo Plane: मुंबई विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणादरम्यान रनवेवर विमान घसरले अन्...; गोंधळाचे वातावरण

Kidney Donate : अंगणवाडी मदतनीस आईने दिली मुलीला किडनी; ‘ससून’मध्ये झाले प्रत्यारोपण

Latest Maharashtra News Updates : येरमाळा महसूल मंडळात गुरुवारी रात्री अतिवृष्टी

Ajit Pawar, Sharad Pawar ना धक्का देणार? Beed मध्ये मोठा डाव टाकण्याच्या तयारीत | Sakal K1

धक्कादायक! अभिनेत्री तेजस्वीनी पंडितच्या आईचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT