Sunil Gavaskar Indian Test Squad  esakal
क्रीडा

Sunil Gavaskar : एक चांगली संधी गमावली... संघनिवडीनंतर गावसकर असं का म्हणाले?

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Gavaskar Indian Test Squad : वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी नुकतेच भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात निवडसमितीने चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, मोहम्मद सिराज यांच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंना वगळले आहे. याचबरोबर जयदेव उनडाकट, मुकेश कुमार, नवदीप सैनी, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैसवाल यांची निवड केली आहे.

निवडसमितीने जरी काही युवा खेळाडूंना संधी दिली असली तरी रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल या वरिष्ठ खेळाडूंना देखील संघात स्थान दिले आहे. भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी या संघनिवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते निवडसमितीने एक चांगली संधी वाया घालवली आहे.

स्पोट्स टुडेशी बोलताना सुनिल गावसकर म्हणाले की, 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संपली आहे. आपणाला तिथे विजेतेपदाने हुलकावणी दिली. आता सर्वात मोठी स्पर्धा ही ऑक्टोबरमध्ये होणारा वनडे वर्ल्डकप आहे. मला वाटले होते की संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंना कसोटी क्रिकेमधून पूर्णपणे ब्रेक देणे गरजेचे होते.'

'आता तुम्ही फक्त मर्यादित षटकांच्या सामन्याकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे होते. ते सर्वजण गेल्या तीन - चार महिन्यापासून सतत क्रिकेट खेळत आहेत. त्यांना खूप कमी ब्रेक मिळाला आहे.'

गावसकर पुढे म्हणाले की, 'त्यांना अजून काही वरिष्ठ खेळाडूंना ब्रेक देऊन जास्तीजास्त युवा खेळाडूंना संधी देता आली नसती का? इथे भारतीय क्रिकेटला चांगली संधी होती. मात्र दुर्दैवाने असं काही झालेलं नाही. मला असे वाटते की त्यांनी एक सुंदर संधी गमावली आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test Live: यशस्वी जैस्वाल 'हे' काय केलंस? बिचाऱ्या पोरी आशेनं आल्या होत्या अन् तू... Mystry Girls Reaction

Government Employees PF : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पीएफ व्याजदरांबाबत नवीन अपडेट ; अर्थ मंत्रालयाकडून अधिसचूना जारी!

अखेर भावना सिद्धूसमोर मनातल्या भावना व्यक्त करणार, लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...'काय उपयोग पण...'

आधीच ठरलेलं मग व्होट कशाला घेता? फक्त दोनच मालिकांना पुरस्कार मिळाल्याने झी मराठीवर प्रेक्षक संतापले; म्हणतात, 'निव्वळ बोगस..'

Vikas Karvande : आत्मविश्वास जिद्दीचा नवा इतिहास! ८४ वर्षाच्या मावळ्याकडून सिंहगडावर १७०६ वी वारी पूर्ण

SCROLL FOR NEXT