YO-YO Test Sunil Gavaskar  
क्रीडा

Sunil Gavaskar: 15 मिनिटं धावलो की मलापण...; यो यो टेस्ट विरोधात गावसकरांनी उगारली बॅट

यो-यो टेस्टवर सुनील गावसकर रागावले...

Kiran Mahanavar

YO-YO Test Sunil Gavaskar : बीसीसीआयने अलीकडेच टीम इंडियामध्ये निवडीसाठी यो-यो चाचणी तसेच डेक्सा स्कॅन अनिवार्य केले आहे. या दोन्ही कसोटीत पात्र ठरलेल्या खेळाडूंनाच टीम इंडियात संधी मिळेल.

पण भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर बीसीसीआयच्या या निर्णयाशी सहमत नाहीत.

भारतीय क्रिकेट संघातील नवोदित खेळाडूंच्या निवडीसाठी यो-यो आणि डेक्सा स्कॅन फिटनेस चाचण्या अनिवार्य करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर त्यांनी टीका केली आहे. यासाठी त्यांनी त्यांचे उदाहरण दिले आहे.

मग बीसीसीआयच्या निवड समितीमध्ये बायो मेकॅनिकल आणि बॉडी सायन्स तज्ज्ञ असायला हवेत असा टोला गावसकर यांनी लगावला.

सुनील गावसकर यांनी एका वृत्तसंस्था मध्ये लिहिलं की, अनेक वर्षांपूर्वी जेव्हा शारीरिक तंदुरुस्तीची क्रेझ सुरू झाली, तेव्हा आमच्याकडे दोन माजी संघसहकारी होते जे निवृत्त झाले आणि त्या हंगामात वेगवेगळ्या मालिकांसाठी संघ व्यवस्थापक झाले. हे दोघेही त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत तंदुरुस्त नव्हते.

त्याचं उदाहरण देताना गावसकर यांने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा एक जुना किस्सा सांगितला की, माझी स्थिती माहीत असूनही संघ व्यवस्थापकाने मला धावायला सांगितले. मी 15 मिनिट धावलो आणि दमलो. मग मी त्यांना सांगितले की जर तो सर्वाधिक धावांच्या आधारे प्लेइंग-इलेव्हन निवडणार असेल तर मला वगळा.

फिटनेस ही वैयक्तिक गोष्ट आहे. वेगवान गोलंदाजांना फिरकीपटूंपेक्षा वेगळ्या तंदुरुस्तीची आवश्यकता असते. फलंदाजांना त्याची सर्वात कमी गरज आहे. क्रिकेटचा फिटनेस सर्वात महत्त्वाचा आहे, त्याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT