IND vs ENG Virat Kohli esakal
क्रीडा

IND vs ENG Virat Kohli : तुमचा बॅझबॉल तर आमचा 'विराटबॉल'... गावसकरांनी इंग्रजांना कशाची घातली भीती?

इंग्लंडच्या बॅझबॉलची भारतीय फिरकीसमोर होणार परीक्षा

अनिरुद्ध संकपाळ

IND vs ENG Virat Kohli : भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वीच इंग्लंडच्या बॅझबॉलची हवा काढून घेतली. इंग्लंडचा कसोटी संघ गेल्या काही वर्षापासून आक्रमक क्रिकेट खेळत आहे. ब्रँडन मॅक्युलमने प्रशिक्षक पद स्विकारल्यापासून संघाने कसोटी खेळण्याची आपली पद्धत बदलली आहे. त्याच पद्धतीला बॅझबॉल म्हणून संबोधलं जात आहे.

सुनिल गावसकरांनी या बॅझबॉलला प्रत्युत्तर म्हणून भारताकडे विराटबॉल आहे असे सांगितले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना हा हैदराबाद येथे खेळवला जाणार आहे. (Bazball Vs Viratball)

काय म्हणाले गावसकर?

सुनिल गावसकर हे स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी इंग्लंडच्या बॅझबॉलचा मुकाबला करण्यासाठी भारताकडे विराटबॉल आहे. गावसकरांनी इंग्लंडविरूद्धच्या विराट कोहलीच्या आकडेवारीचा आधार घेतला. ते म्हणाले की यंदाच्या कसोटी मालिकेत विराट कोहली हा भारताचे मोठे हत्यार असणार आहे. विराट कोहलीने इंग्लंडविरूद्ध 28 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 42.36 च्या सरासरीने 1991 धावा केल्या आहेत.

सुनिल गावसकर यांनी बॅझबॉलबाबत अजून एक मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, 'बॅझबॉल हे भारतात वर्क करणार कारण आता अशा बॅट बनवल्या जात आहेत त्यामुळे मिसटाईम झालेला फटका देखील षटकार मिळवून देतो. त्यामुळे बॅझबॉल नक्की वर्क होईल.'

गावसकरांच्या मते भारत - इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना अत्यंत महत्वाचा आहे. या सामन्यात आपल्याला इंग्लंडचा बॅझबॉल भारताच्या फिरकीपटूंसमोर टिकतो का याची चाचणी घेता येईल. तुम्ही रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल या दोघांना कमी लेखून चालणार नाही. त्यांनी 2020 - 21 च्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत मिळून 32 आणि 27 विकेट्स घेतल्या होत्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT