Sunil Gavaskar Statement About Hardik Pandya and Rishabh Pant esakal
क्रीडा

टीम इंडियात पांड्या खेळणार कोणत्या क्रमांकावर, गावसकर म्हणाले...

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) पहिल्यांदाच नेतृत्व करताना गुजरात टायटन्सला पहिल्याच आयपीएल (IPL 2022) हंगामात विजेतपदापर्यंत पोहचवले. हार्दिकने यंदाच्या हंगामात फक्त नेतृत्वच केले नाही तर त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीतही आपला दम दाखवून दिला. हंगामापूर्वी त्याच्या गोलंदाजीबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र त्याने 140 किमी प्रतीतास वेगाने गोलंदाजी करत आपण बॉलिंग करण्यासाठी फिट झालो असल्याचे दाखवून दिले.

हार्दिकने या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियातील आपली गमावलेली जागा देखील पुन्हा मिळवली आहे. मात्र आयपीएलमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा हार्दिक पांड्या टीम इंडियात कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार हा प्रश्नच आहे. याबाबत भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी आपले मत व्यक्त केले.

सुनिल गावसकर म्हणाले की, 'मला असे वाटते हार्दिक पांड्या भारतीय संघात पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तुम्ही विचार करा जर भारताकडे हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत आहेत. ते दोघे या क्रमांकावर येऊन फटकेबाजी करायला लागले तर भारत 14 ते 20 या 6 षटकात जवळपास 100 ते 120 धावा करेल अशी अपेक्षा आहे. त्यांच्याकडे ती क्षमता आहे. मी हे पाहण्यासाठी उत्सुक आहे. ऋषभ पंत - हार्दिक पांड्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येतील'

हार्दिक पांड्याने यंदाच्या आयपीएल हंगामात 15 सामन्यात 487 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 44.27 इतकी राहिली आहे. त्याने 131.27 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. फलंदाजीतील ही त्यांची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी त्याने एका हंगामात 16 सामन्यात 402 धावा केल्या आहेत. 2019 ला मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने ही कामगिरी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC: अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठोस धोरण ठरवा, ठाकरे गटाची मागणी

स्टार प्रवाहने केली एक दोन नाही तब्बल ६ नव्या मालिकांची घोषणा; २ कार्यक्रमही सोबतीला, ही आहेत नाव आणि कलाकार

Kalyan: इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे अनोखे आंदोलन; घोड्यावरून मोर्चा काढत नागरिकांना मेलोडीचे वाटप

Latest Marathi News Live Update : भूममध्ये पोलिसाचेच चार लाख पळवले

US-Iran Ceasefire Deal: 'होर्मुज'मध्ये शांतता आणि इराणसाठी 300 अब्ज डॉलरची गुंतवणूक; अमेरिका-इराणमध्ये शांतता कराराचा नवीन मसुदा

SCROLL FOR NEXT