sunil gavaskar thretened sachin Tendulkar in interview set target of 15000 test runs 40 hundreds for him watch video 
क्रीडा

Sunil Gavaskar Video : तर मी तुझा गळा दाबेन…; गावसकरांनी मुलाखत सुरू असतानाच सचिनला दिली होती धमकी

रोहित कणसे

सचिन तेंडूलकर हे नाव प्रत्येक भारतीयाच्या ओळखीचे आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी त्यांने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वयाच्या 39 व्या वर्षी त्यांनी 'क्रिकेटचा देव' म्हणून निवृत्ती घेतली. सचिन तेंडुलकरचे खेळावर असलेले प्रेम आणि दुर्मिळ प्रतिभा यासाठी त्याला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार - भारतरत्न देखील देण्यात आला आहे.

यादरम्यान सध्या दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, खूप जुन्या या व्हिडीओमध्ये सुनिल गावस्कर हे सचिनच्या भविष्याबद्दल काही काही अंदाज बोलून दाखवत आहेत. सचिन तेंडुलकर त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये शेकडो रेकॉर्ड्स नावावर केले आहेत. अनेक रेकॉर्ड तर कोणी मोडू शकणार नाही असे देखील बोलले जाते.

गावस्कर नेमकं काय म्हणाले?

यादरम्यान 90 च्या दशकाच्या सुरुवातीला दिलेल्या एका मुलाखतीत, सुनिल गावस्कर यांनी सचिन फलंदाज म्हणून 15000 कसोटी धावा आणि 40 शतके ठोकेल असा अंदाज लावला होता. गावस्कर यांनी स्वतः कसोटी क्रिकेटमध्ये 10122 धावा आणि 34 शतके झळकावली, त्यांनी हे लक्ष्य साध्य करण्यात अपयशी ठरल्यास तेंडुलकरचा गळा दाबण्याची 'धमकी' दिली होती.

गावस्कर म्हणाले की, "आणि मला एक माहीत आहे की जर त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी त्याने किमान 15000 धावा आणि 40 कसोटी शतके केली नाहीत तर मी वैयक्तिकरित्या जाऊन त्याचा गळा दाबून टाकीन. वीस वर्षांनंतर माझ्या हातात ताकद राहणार नाही, त्यामुळे तो कदाचित तो वाचेल. पण माझ्यासाठी ते करण्यासाठी मी कोणाला तरी नियुक्त करीन. सचिन, मला आशा आहे की तू मलाआणि भारतीय क्रिकेटला निराश होऊ देणार नाहीस." यावर "मी माझ्या सर्वतोपरी प्रयत्न करेन," असे उत्तर सचिन तेंडूलकर गावासकरांना देतो.

तेंडूलकरने निराश केलं नाही...

सचिनने गावस्कर यांना या बाबतीत निराश केले नाही. त्याने विक्रमी 200 कसोटी सामने खेळत 53.78 च्या सरासरीने 15921 धावा केल्या आहेत. तसेच त्याने फॉर्मेटमध्ये 51 शतके पूर्ण केली आहेत. इतकेच नाही तर 49 वर्षीय खेळाडूने 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 44.83 च्या सरासरीने 18426 धावा केल्या आहेत. त्याने वनडे फॉरमॅटमध्ये 49 शतके ठोकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

SCROLL FOR NEXT