Supreme Court Big Relief For Sourav Ganguly Jay Shah
Supreme Court Big Relief For Sourav Ganguly Jay Shah esakal
क्रीडा

Sourav Ganguly : सौरभ गांगुली, जय शहा यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांना मोठा दिलासा दिला आहे. आज (दि. 14) झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या घटनेत दुरूस्ती करण्याची परवानगी दिली आहे. ही दुरूस्ती बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांच्या कूलिंग ऑफ कालावधीच्या नियमात करण्यात येणार आहे. आता राज्य क्रिकेट संघटनेतील पदाचा कालावधी आणि बीसीसीआयमधील पदाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कूलिंग ऑफ कालावधी लागू होणार आहे. यामुळे सौरभ गांगुली आणि जय शहा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Supreme Court Big Relief For Sourav Ganguly Jay Shah allows amendments to the BCCI Constitution to relax cooling off period)

बीसीसीआयने दाखल केलेल्या कूलिंग ऑफ कालावधीच्या नियमात दुरूस्ती करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 'कोणता कूलिंग ऑफ कालावधी असावा याचा विचार केला असता सुचवलेली बीसीसीआयची घटना दुरूस्ती कूलिंग ऑफ कालावधीच्या मूळ उद्येशाला धक्का पोहचवत नाही. त्यामुळे सुचवलेली कूलिंग ऑफ कालावधीबाबतची घटना दुरूस्ती न्यायायल मान्य करत आहे.' अशी टिप्पणी केली.

नव्या बदलानुसार

A - जी व्यक्ती राज्य क्रिकेट संघटनेत सलग दोन टर्म पद ग्रहण करते त्यानंतर त्याला कूलिंग ऑफ कालावधीला सामोरे जावे लागणार आहे.

B - जर एखादी व्यक्ती बीसीसीआयमध्ये सलग दोन टर्म पद ग्रहण केले असेल तर त्या व्यक्तीला कूलिंग ऑफ कालावधीला सामोरे जावे लागेल.

C - जर एखाद्या व्यक्तीची राज्य संघटनेत एका कार्यकाळासाठी निवड झाली. त्यानंतर त्या व्यक्तीने बीसीसीआयमध्ये एक टर्म पद ग्रहण केले असेल तर एकत्रित दोन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्या व्यक्तीला कुलिंग ऑफ कालावधी लागू होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT