Suresh Raina Retirement
Suresh Raina Retirement 
क्रीडा

Suresh Raina Retirement : अखेर सुरेश रैनाचा क्रिकेटला अलविदा, सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती

Kiran Mahanavar

Suresh Raina Announce Retirement CSK : भारताचा स्टार फलंदाज सुरेश रैनाची आयपीएल 2023 मध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे. सुरेश रैनाने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे की, सुरेश रैना क्रिकेट खेळत राहणार आहे. हिंदी वृत्तानुसार सुरेश रैना दक्षिण आफ्रिका, यूएई आणि श्रीलंकेच्या टी-20 लीगच्या पुढील हंगामात सहभागी होणार आहे.

सुरेश रैनाला यंदाच्या आयपीएलसाठी कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. सुरेश रैनाने 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यामुळे त्याच्या आयपीएलमध्ये पुनरागमनाची शक्यताही जवळपास संपुष्टात आली होती. सुरेश रैनाने आता देशांतर्गत क्रिकेटला अलविदा करून परदेशी लीगमध्ये खेळणार आहे. बीसीसीआयने नुकतेच स्पष्ट केले आहे की त्यांच्याशी करार असलेला कोणताही खेळाडू कोणत्याही परदेशी लीगमध्ये भाग घेऊ शकत नाही. सुरेश रैनाने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती न घेता परदेशी टी-20 लीगमध्ये भाग घेतला असता.

सुरेश रैना हा T20 फॉरमॅटमधील जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. सुरेश रैनाला मिस्टर आयपीएल म्हणूनही ओळखले जाते. रैनाने आयपीएलमधील 205 सामन्यांमध्ये 32.5 च्या सरासरीने आणि सुमारे 137 च्या स्ट्राइक रेटने 5528 धावा केल्या आहेत. सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्जला तीन वेळा विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, 2020 मध्ये सुरेश रैनाची आयपीएल कारकीर्द शेवटच्या दिशेने गेली. संघ व्यवस्थापनाशी वादामुळे सुरेश रैनाला 2020 चा आयपीएलमध्ये भाग घेतला नाही. त्यानंतर 2022 मध्ये त्याने आयपीएल मेगा लिलावात 1 कोटी बेस प्राईस ठेवली होती. मात्र त्याला कोणी विकत घेतले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT