suresh raina wife priyanka choudhary sakal
क्रीडा

Suresh Raina : रैनाच्या मैनाची हटके लवस्टोरी, प्रपोझसाठी चक्क त्यानं...

प्रियांकाला प्रपोज करण्यासाठी रैनाने तब्बल इतक्या तासांचा प्रवास केला...

Kiran Mahanavar

suresh raina wife priyanka choudhary : अनुभवी अष्टपैलू सुरेश रैनाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मंगळवार 6 सप्टेंबर रोजी त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. दोन वर्षांपूर्वी 15 ऑगस्टला त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला, ज्या दिवशी महान महेंद्रसिंग धोनीनेही निवृत्ती जाहीर केली होती. रैना आयपीएलने ऑक्टोबर 2021 मध्ये अबू धाबी येथे शेवटचा सामना खेळला होता.

सुरेश रैनाची प्रेमकहाणीही बरीच फिल्मी आहे. प्रियांकाला प्रपोज करण्यासाठी त्याने तब्बल 40 तासांचा प्रवास केला होता. एका टीव्ही शोमध्ये त्याने स्वतः ही गोष्ट सांगितली. यावेळी रैना म्हणाला, 2015 मध्ये विश्वचषकादरम्यान मी ऑस्ट्रेलियात होतो. प्रियांकाने मला फोन केला आणि इंग्लंडला निघून गेली. त्यानंतर प्रियांकाने मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. या दरम्यान मी सुमारे 40 तासांचा लांबचा प्रवास करून इंग्लंडला गेलो. त्यानंतर रैनाने 2015 मध्ये ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड कपमधून परतल्यानंतर प्रियंकासोबत लग्न केले. रैनाला एक मुलगा रिओ आणि एक मुलगी ग्रेशिया आहे. रैना मुलीच्या नावाने एक चॅरिटी फाउंडेशन देखील चालवत आहे.

रैनाने भारतासाठी 300 हून अधिक सामने खेळले आहेत. रैनाने 18 कसोटी सामन्यात एक शतक आणि 7 अर्धशतकांच्या मदतीने 768 धावा केल्या आहेत. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 226 सामन्यांमध्ये 5615 धावा केल्या, ज्यात 5 शतके आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. भारतासाठी त्याने 78 टी-20 सामने खेळले आणि 1 शतकही केले. त्याने या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 1605 धावा केल्या आणि 13 विकेट्सही घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT