Suryakumar Yadav sakal
क्रीडा

Suryakumar Yadav : न्यूझीलंडच्या ढगाळ वातावरणात सूर्या तळपला; ठोकले वर्षात दुसरे शतक

सूर्यकुमार यादवने 2022 चे दुसरे शतक झळकावले, रोहित शर्माच्या मोठा विक्रमाची केली बरोबरी

Kiran Mahanavar

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची टी-20 मधील उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये उत्कृष्ट शतक ठोकले आहे. अशा प्रकारे त्याच्या 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 1100 धावा पूर्ण झाल्या आहेत. सूर्याने 49 चेंडूत शतक पूर्ण केले. 2022 च्या आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हे त्याचे दुसरे शतक आहे. अशाप्रकारे त्याने रोहित शर्माच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

रोहितने 2018 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 2 शतके झळकावली होती. याआधी टी-20 वर्ल्ड कपमध्येही त्याने चांगली कामगिरी करताना 200 हून अधिक धावा केल्या होत्या. या सामन्यात प्रथम खेळताना टीम इंडियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 191 धावांची मोठी धावसंख्या उभारली. सूर्या 51 चेंडूत 111 धावा करून नाबाद राहिला. 11 चौकार आणि 7 षटकार मारले. वेगवान गोलंदाज टीम साऊदीने 20व्या षटकात हॅट्ट्रिक घेत धावसंख्या 200 धावांपर्यंत पोहोचू दिली नाही.

सूर्यकुमार यादवने यापूर्वी 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर 117 धावांची शानदार खेळी केली होती. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. अशा स्थितीत हा सामना जिंकणारा संघ मालिकेत 1-0 अशी आघाडी घेईल आणि मालिका गमावण्याचा धोकाही टळेल.

सूर्यकुमार यादवच्या 2022 च्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील कामगिरीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 30 सामन्यांच्या 30 डावांमध्ये 1151 धावा केल्या आहेत. त्याने 2 शतके आणि 9 अर्धशतके केली आहेत. म्हणजेच त्याने 11 वेळा 50 पेक्षा जास्त धावांची इनिंग खेळली आहे. तसेच तो 6 वेळा नाबाद राहिला आहे. त्याने 105 चौकार आणि 67 षटकार मारले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

‘कुरळे ब्रदर्स’ची धमाल आता घरबसल्या! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ आता ओटीटीवर, कधी कुठे पाहाल?

नागपूरमध्ये ९० टक्के मोबाईल टॉवर अनधिकृत? खळबळजनक आरोपानंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, आणणार नवं धोरण!

LPG Crisis: दररोज ७५ लाख बुकिंग; तरीही गॅस तुटवडा नाही, साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम; केंद्राने दिले कडक निर्देश

SCROLL FOR NEXT