Suryakumar Yadav sakal
क्रीडा

Video : सूर्यकुमारचा षटकारांचा षटकार! विराटनेही केला सलाम

विराट कोहलीनंतर फलंदाजीला आला आणि त्याच्यापेक्षा जास्त धावा सूर्यकुमार यादवने केल्या.

Kiran Mahanavar

India vs Hong Kong Asia Cup : आशिया कपमध्ये भारताचा दुसरा सामना हाँगकाँगविरुद्ध दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवरही खेळला जात आहे. सूर्यकुमार यादवने आपल्या किलर बॅटिंगने हाँगकाँगच्या गोलंदाजांची धुलाई केली. सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत 68 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवच्या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. फलंदाजीदरम्यान सूर्यकुमार यादवचा स्ट्राइक रेट 261.54 आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 2 गडी गमावून 192 धावा केल्या आणि हाँगकाँगला विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य दिले.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये 1 गडी गमावून 44 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा 13 चेंडूत 21 धावा करून झेलबाद झाला. केएल राहुलने अतिशय संथ खेळी खेळली आणि तो 39 चेंडूत 36 धावा करून बाद झाला.

सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीने यानंतर एकही विकेट पडू दिली नाही आणि भारताला मजबूत स्थितीत आणले. सूर्यकुमार यादवने तुफानी फलंदाजीला सुरुवात करत पहिल्या दोन चेंडूत दोन चौकार मारले. दरम्यान, विराट कोहलीने 44 चेंडूत 59 धावा करत अर्धशतक झळकावले. विराटने 6 महिन्यांनंतर टी-20 मध्ये अर्धशतक झळकावले आहे. सूर्यकुमार यादवनेही यानंतर अर्धशतक झळकावले. त्याने सलग दोन षटकार मारत अवघ्या 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या कारकिर्दीतील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे.

या पारी मध्ये विराट पूर्णपणे सेट झाला होता ज्यावेळेस सूर्यकुमार यादव बॅटिंग करायला आला होता. विराट कोहलीनंतर फलंदाजीला आला आणि त्याच्यापेक्षा जास्त धावा सूर्यकुमार यादवने केल्या. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 98 धावांची भागीदारी झाली. ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने अवघ्या 26 चेंडूत 68 धावांची दमदार खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने 6 षटकार आणि 6 चौकार मारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT