Suryakumar Yadav Blasting 2022 Year ESAKAL
क्रीडा

Suryakumar Yadav : विराटलाही बॅकफूटवर टाकणारं 'सूर्या'चं झळाळतं 2022 वर्ष! सर्व कारनामे एका क्लिकवर

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav Blasting 2022 Year : गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 मार्च 2021 ला भारताकडून एका 31 वर्षाच्या खेळाडूने टी 20 पदार्पण केले. हे वाक्य वाचून तुम्हाला अरे हे काही पदार्पणाचे वय आहे का? असा प्रश्न पडला असेल. मात्र पदार्पणाच्या पहिल्या चेंडूपासूनच या तिशी ओलांडलेल्या 'युवा' खेळाडूने सर्वांना अवाक केले.

त्याचा पदार्पणाचा पहिलाच चेंडू हा इंग्लंडचा अत्यंत वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने टाकल, तोही अंगावर येणार शॉर्ट बॉल! मात्र या खेळाडूने तो लिलया हूक करत स्टँडमध्ये पोहचवला. हा आंतरराष्ट्रीय पदार्पण षटकार मारून सुरू करणारा खेळाडू आहे सूर्यकुमार यादव. हा तोच सूर्यकुमार यादव आहे ज्याचा आयपीएलमध्ये भारताची रन मशीन विराट कोहलीबरोबर वाद झाला होता.

अनेक वर्षे धावांचा पाऊस पाडून देखील टीम इंडियात ऐन जवानीत संधी मिळाली नसल्याने सूर्यकुमार यादव निराश झाला होता. मात्र अखेर त्याच्यासाठी टीम इंडियाची दारे उघडली अन् अल्पावधीतच सूर्या भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या गळातील ताईद झाला. तसेही रोहित शर्मा - विराट कोहलीच्या बॅटमधून धावा येण्याचा ओघ अटला होता. अशा परिस्थितीत भारताच्या बॅटिंग ऑर्डरची धुगा सूर्याने पदार्पणानंतर लगचेच आपल्या खांद्यावर घेतली.

त्याने आपल्या वैविध्यपूर्ण फटेकबाजीने एक वगळेच ग्लॅमर निर्माण केले. या ग्लॅमरला त्याने 2022 मध्ये दैदिप्यमान कामगिरीच्या आकडेवारीची झालर देखील घातली. यामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात 2022 मध्ये विराटच्या ऐवजी सूर्यकुमार यादव ड्रायव्हिंग सीटवर होता. फॅन्सच नाही तर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी देखील त्याची धास्ती घेतली होती. (Latest Sports News)

सूर्याने एकदा का जम बसवला तर सामना पाहता पाहता आपल्या हातून निघून जातो हे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू चांगलेच ओळखून होते. अशा या सूर्याने 2022 हे वर्ष खऱ्या अर्थाने गाजवले.

- सूर्यकुमार यादवने वर्षभरात जवळपास 44 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

- कसोटी पदार्पण न केलेल्या सूर्याने फक्त टी 20 आणि वनडे क्रिकेट खेळून एकूण 1424 धावा ठोकल्या आहेत.

- सूर्याने 44 पैकी 31 टी 20 सामने खेळले, त्यात त्याने 1164 धावा ठोकल्या.

- याच वर्षी त्याने दोन टी 20 आंतरराष्ट्रीय शतकं देखील ठोकली. याचबरोबर अर्धशतकांची बेरीज वेगळीच.

- सूर्याच्या टी 20 क्रिकेमधील जवळपास 71.4 टक्के धावा या चौकारांनी आल्या आहेत.

- त्याने 104 चौकार आणि 68 षटकार ठोकले आहेत.

- 2022 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा मान देखील पटकावला.

- सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये 187.43 च्या स्ट्राईक रेटने धावा ठोकल्या.

- सूर्यकुमार यादवने आव्हानात्मक खेळपट्ट्या असलेल्या ऑस्ट्रेलियात 190, इंग्लंडमध्ये 201 आणि न्यूझीलंडमध्ये 203 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

आयसीसी रँकिंगही 'सूर्या'ने तापवली

- सूर्या 2022 च्या जुलै महिन्यात टी 20 बॅटिंग रँकिंगमध्ये 5 व्या स्थानावर होता. इंग्लंडविरूद्धच्या शतकानंतर त्याने 44 अंकांची उडी घेतली होती.

- त्यानंतर सूर्याने अवघ्या 20 दिवसात टी 20 रँकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले.

- त्याच्या आणि बाबर आझममध्ये फक्त दोन पॉईंटचे अंतर राहिले होते.

- मात्र पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने बाबर आझमला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले.

- सूर्याने ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्डकपमध्ये सलग दोन अर्धशतके ठोकत मोहम्मद रिझवानला रँकिंगच्या सिंहासनावरून खाली खेचले.

- तेव्हापासून आयसीसी टी 20 बॅटिंग रँकिंमध्ये सूर्यकुमार यादवच अव्वल स्थानाच्या सिंहासनावर विराजमान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT