Suryakumar Yadav ESAKAL
क्रीडा

Suryakumar Yadav : सूर्यकुमारला रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडण्याची संधी मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना ख्राईस्टचर्च येथे होणार आहे. न्यूझीलंडने पहिला वनडे सामना जिंकून मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाला. आता तिसऱ्या सामन्यात मालिकेचा निकाल लागण्याची शक्यता आहे. भारताला मालिका वाचवण्यासाठी तिसरा वनडे सामना जिंकणे खूप गरजेचे आहे. भारताच्या फलंदाजीची मदार ही सूर्यकुमार यादववर असणार आहे. तसेच या सामन्यात सूर्यकुमार यादवला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

तिसऱ्या वनडे सामन्यात सूर्यकुमार यादव आपल्या 360 डिग्री खेळीचा जलवा दाखवू शकला तर तो रोहित शर्माचे एक खास रेकॉर्ड मोडू शकतो. जर सूर्यकुमार यादवने तिसऱ्या सामन्यात पाच षटकार मारले तर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत सूर्यकुमार अव्वल स्थानावर पोहचू शकतो.

रोहित शर्माने 2019 मध्ये एकूण 78 षटकार मारले. आता सूर्यकुमार यादवच्या रडावर रोहितचा हा विक्रम आहे. तिसऱ्या वनडे सामन्यात जर सूर्यकुमार यादवने पाच षटकार मारले तर तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. मात्र तिसऱ्या सामन्यावर देखील पावसाचे सावट आहे. जर सामन्यात पावसाचा व्यत्यय आला नाही तर सूर्यकुमारला हा विक्रम मोडण्याची संधी आहे.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

SCROLL FOR NEXT