Suryakumar Yadav India Test Squad  esakal
क्रीडा

Suryakumar Yadav : कसोटी संघात सूर्याची ग्रँड एन्ट्री तर जडेजासाठी BCCI ची खास नोट

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav India Test Squad : बीसीसीआयने आज (दि.13) न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे आणि टी 20 संघाची घोषणा केली. याचबरोबर निवडसमितीने ऑस्ट्रेलियासोबत होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी देखील भारतीय संघाची घोषणा केली. विशेष म्हणजे भारताचा 360 डिग्री खेळाडू सूर्यकुमार यादवचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. सूर्याचे कसोटी खेळाडू होण्याचे स्वप्न आता पुर्णत्वास येत आहे.

सूर्यकुमार यादवने टी 20 क्रिकेटमध्ये आपला डंका वाजवल्यानंतर त्याला वनडे संघात देखील शाश्वत स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेत त्याला प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. यामुळे निवडसमितीच्या मनात चाललयं तरी काय असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र भारतीय टी 20 संघाचा उपकर्णधार झालल्या सूर्याला निवडसमितीने कसोटी संघात स्थान देत सूर्या भारतीय संघातील एक महत्वाचा तीनही फॉरमॅट खेळू शकणारा खेळाडू असल्याचे संकेत दिले.

बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यासाठी संघ घोषित करताना संघात फिरकी अष्टपैलू म्हणून रविंद्र जडेजा सोबतच अक्षर पटेलची वर्णी लावली आहे. याचबरोबर संघाची घोषणा करताना रविंद्र जडेजासाठी एक नोटही ठेवली.

'रविंद्र जडेजाची निवड ही त्याच्या फिटनेसची स्थिती पाहून केली जाईल.' बीसीसीआयच्या या नोटवरून जडेजा अजून फिट नसल्याचे संकेत मिळत आहेत. जडेजाने आजच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक क्रिप्टिक ट्विट केले होते. त्यात तो 'काही बोलू नका फक्त हसा' असे म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT