Suryakumar Yadav Mohammad Rizwan  esakal
क्रीडा

Suryakumar Yadav : सूर्याच्या रडारवर रिझवानचे मोठे रेकॉर्ड; न्यूझीलंड दौऱ्यावर करणार धमाका?

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav Mohammad Rizwan : भारतीय टी 20 संघ आजपासून (दि.18) न्यूझीलंडविरूद्धची तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. आज वेलिंग्टनवर मालिकेतील पहिला टी 20 सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान, युवा भारतीय संघात नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये धावांचा पाऊस पाडणारा सूर्यकुमार यादवचा देखील समावेश आहे. न्यूझीलंडमधील छोट्या मैदानांवर सूर्यकुमार यादवचा 360 डिग्री खेळ पाहण्याची मजात काही और असणार आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादवला या मालिकेत पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानचे मोठे रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.

पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने 2021 या कॅलेंडर वर्षाच टी 20 क्रिकेटमध्ये 1326 धावा केल्या होत्या. भारताच्या सूर्यकुमार यादवने नुकतेच वर्षात 1000 टी 20 धावा पूर्ण केल्या असून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी 20 धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी त्याला 286 धावांची गरज आहे. सूर्यकुमार यादवने 29 सामन्यात 1040 धावा केल्या आहेत.

मोहम्मद रिझवानेच रेकॉर्ड मोडण्यासाठी सूर्यकुमारकडे न्यूझीलंड दौऱ्यावर फक्त तीन सामने आहेत. सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये 9 अर्धशतके ठोकली असून एक शतकही त्याच्या नावावर आहे. सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो भारताकडून एका कॅलेंडर वर्षात 1000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

भारतासाठी 2021 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पदार्पण करणारा सूर्यकुमार यादव 2022 मधील वर्ल्डकपमध्ये भारताचा सर्वाधिक प्रभावित करणारा खेळाडू ठरला. सूर्यकुमारचा वर्ल्डकपमधील फॉर्म पाहता मोहम्मद रिझवानचे रेकॉर्ड धोक्यात आहे. न्यूझीलंडमधील छोट्या ग्राऊंडचा चांगला फायदा सूर्यकुमार यादवला मोठ्या खेळी करताना होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT