Suryakumar Yadav sakal
क्रीडा

Suryakumar Yadav : टीम इंडियाचा 360 डिग्री प्लेयर संघातुन बाहेर! मोठे कारण आले समोर...

टीम इंडियातील सूर्यकुमार यादवचे स्थान निश्चित नाही.

Kiran Mahanavar

Suryakumar Yadav : भारताचा स्फोटक 360 डिग्री प्लेयर सूर्यकुमार यादवने टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. टी-20 विश्वचषकात 239 धावा करणाऱ्या सूर्यकुमारने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक 124 धावा केल्या आणि फक्त एकदाच तो बाद झाला. दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद 111 धावा केल्या. त्याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने टी-20 मालिकेवर कब्जा केला.

टीम इंडियाचा आता उद्यापासून म्हणजेच 25 नोव्हेंबरपासून किवी संघाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त धावा इतर कोणत्याही भारतीय खेळाडूने केल्या नाहीत, परंतु त्यानंतरही तो निवडकर्त्यांचा विश्वास जिंकू शकला नाही. न्यूझीलंडनंतर भारताला पुढील महिन्यात बांगलादेशकडून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या मालिकेत त्याला संधी देण्यात आलेली नाही.

सूर्यकुमार यादवने भारताकडून आतापर्यंत 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 12 डावात 34 च्या सरासरीने 340 धावा केल्या ज्यात 99 च्या स्ट्राइक रेट 2 अर्धशतके आहे. म्हणजेच टी-20 च्या तुलनेत त्याची वनडेतील कामगिरी काही खास नाही. सूर्याने 40 टी-20 आंतरराष्ट्रीय डावात 44 च्या सरासरीने 1408 धावा केल्या आहेत. त्याने 2 शतके आणि 12 अर्धशतके केली आहेत. स्ट्राइक रेट 181 आहे. पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. अशा स्थितीत संघ व्यवस्थापनाला मधल्या फळीत जास्तीत जास्त खेळाडू आजमावायचे आहेत. त्यामुळे सूर्यकुमार यादवला विश्रांती दिली आहे.

विराट कोहली क्रमांक-3 वर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळणार याची खात्री आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामीला येऊ शकतात. अशा स्थितीत मधल्या फळीतील श्रेयस अय्यर आणि केएल राहुलसारख्या खेळाडूंपेक्षा सूर्यकुमार यादवला चांगली कामगिरी करावी लागेल. याशिवाय देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणारे रजत पाटीदार आणि राहुल त्रिपाठीही टीम इंडियाचे दरवाजे सतत ठोठावत आहेत. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दोघांना संघात स्थान मिळाले आहे. अशा परिस्थितीत सूर्याला एकदिवसीय संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याच्या कामगिरीत आणखी सुधारणा करावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT