Suryakumar Yadav IND vs SL T20: sakal
क्रीडा

IND vs SL T20: श्रीलंकेविरुद्ध मालिकेआधी सूर्याने सिद्धिविनायक मंदिरात पडला नारळ

Kiran Mahanavar

Suryakumar Yadav IND vs SL T20: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका मंगळवारपासून सुरू होत आहे. ज्याचा पहिला सामना 3 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजल्यापासून वानखेडे स्टेडियम मुंबई येथे खेळला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला.

सूर्यकुमार यादवने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी त्यांच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी पिवळा कुर्ता पायजमा घातला आहे. फोटोवर सिद्धिविनायक मंदिर लिहिले आहे. खरे तर सूर्यकुमार यादवने सिद्धिविनायक मंदिरात पोहोचून देवाचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. याआधीही अनेकवेळा सूर्या दर्शनासाठी या मंदिरात आला आहे.

श्रीलंकेविरुद्ध खेळली जाणारी मालिका भारतासाठी खास असणार आहे. कारण विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताला ही मालिका खेळायची आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी नवा कर्णधार हार्दिक पांड्या आणि तो मैदानावर खेळाडूंना कसे मार्गदर्शन करणार याकडे सर्वांच्या नजरा असतील.

भारतीय टी-20 संघ - हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), ॠतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हूडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT