Suryakumar Yadav esakal
क्रीडा

Suryakumar Yadav : आयपीएल आहेच की... सूर्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यापूर्वी असं का म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav : भारतीय संघ उद्या (दि. 10) दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आपला पहिला टी 20 सामना खेळणार आहे. यापूर्वी भारताचा काळजीवाहू कर्णधार सूर्यकुमार यादव आज पत्रकारांशी बोलला. भारतीय संघ 2024 मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपपूर्वी फार कमी टी 20 सामने खेळणार आहे. भारतीय संघ वर्ल्डकपपूर्वी फक्त 6 टी २० सामने खेळणार आहे. याबाबत सूर्यकुमार यादवला प्रश्न विचारण्यात आला होता.

सूर्यकुमारला भारतीय संघ इतके कमी टी 20 सामने खेळणार आहे ही संघासाठी समस्या तर ठरणार नाही ना असं विचारण्यात आलं. त्यावेळी त्याने आयपीएलची आठवण करून दिली.

सूर्या म्हणाला, 'होय आम्ही वर्ल्डकपूर्वी फार कमी आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळणार आहोत. मात्र आम्ही आयपीएल 2024 मध्ये 14 सामने देखील खेळणार आहोत. खेळाडूंना भरपूर सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्याकडे चांगला अनुभव गोळा होईल. त्यामुळे आम्ही याबाबत फार विचार करत नाहीये.'

सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला की, संघातील सर्व खेळाडूंना त्यांची जबाबदारी माहिती आहे. संघ योग्य दिशेने पुढे जात आहे. 'प्रत्येकाला त्यांची संघातील भुमिका माहिती आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत कसं खेळायचं हे देखील ते जाणतात.'

भारतीय संघ रविवारपासून दक्षिण आफ्रिका दौरा सुरू करणार आहे. डर्बन येथील 10 डिसेंबरला होणाऱ्या पहिल्या टी 20 सामन्याने या मालिकेची सुरूवात होईल. नुकतेच भारताने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्धची 5 टी 20 सामन्यांची मालिका 4 - 1 अशी जिंकली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed ACB: पापाचा घडा भरला! स्वतःला सिंघम समजणारा तहसीलदार निघाला महालाचखोर; ६ लाख ४० हजार रुपये घेताना अटकेत

Pune Crime : प्रेमप्रकरणातून तरुणाने संपविले जीवन; कोरेगाव पार्कमधील प्रकार, पाच जणांवर गुन्हा

DCM Sunetra Pawar : माळेगाव'चे शेतकऱ्यांना २०० रुपये कांडे पेमेंट जाहीर

Hailstorm Strong Wind : पाचोडसह परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा; झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित; आंबा-मोसंबी बागांचे नुकसान

Parli Vaijnath News : परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरास 151 किलो चांदीचा त्रिशूल मध्य प्रदेशातील भाविकांकडून अर्पण

SCROLL FOR NEXT