Suryakumar Yadav Smart Batting Example For Rest Of Indian Batsman In India Vs Australia Warm Up Match  esakal
क्रीडा

Suryakumar Yadav : स्मार्ट सूर्याला जमतं मग इतरांना का नाही?

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Australia Warm Up Match Suryakumar Yadav : भारताने टी 20 वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सराव सामन्यात 20 षटकात 7 बाद 186 धावांपर्यंत मजल मारली. भारताने पहिल्या 10 षटकात जवळपास 10 च्या सरासरीने धावा केल्या. मात्र ठराविक अंतराने भारताच्या विकेट्स पडल्याने भारताला 200 चा टप्पा पार करताना आला नाही. भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियातील मोठ्या बाऊंड्री आणि बाऊन्स याच्याशी जुळवून घेण्यात अडचण येत असल्याचे जाणवत होते. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादवने ज्या प्रकारे फलंदाजी केली ते इतर फलंदाजांनी शिकण्याची गरज आहे.

सूर्यकुमार देखील सुरूवातीला अडखळला

रोहित शर्मा स्विप मारण्याच्या नादात झेलबाद झाला आणि सूर्यकुमार यादव क्रीजवर आला. सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला त्यावेळी 8.2 षटकात 80 धावा झाल्या होत्या. आल्या आल्या सूर्यकुमार यादवने देखील काही फटके हवेत मारले. मात्र त्याला बाऊन्सचा अंदाज आल्यावर त्याने योग्यप्रकारने गॅपमध्ये फटके मारण्यास सुरूवात केली. सूर्यकुमार यादवने रोहित शर्माप्रमाणे फिरकीपटूला स्विप न मारता त्याच्या बाऊन्सा वापर करून स्मार्ट फटकेबाजी केली. त्याने खेळपट्टीच्या अनुशंगाने फटक्यांची निवड करत प्रतीषटक 10 धावांची सरासरी कायम राखण्याचा प्रयत्न केला.

फटक्यांची योग्य निवड

दुसऱ्या बाजूने विराट कोहली देखील चांगला फलंदाजी करत होता. मात्र मिचेल स्टार्कच्या अखूड चेंडूवर पूल मारण्याच्या नादात तो बाद झाला. ऑस्ट्रेलियातील ग्राऊंड मोठ्या असल्याने फटक्यांची योग्य निवड करणे गरजेचे आहेय विराट कोहली तिथंच चुकला. यानंतर हार्दिक पांड्या देखील खेळपट्टीच्या उसळीने फसला.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांंनी फटक्यांची योग्य निवड केली असती तर ते बाद झाले नसते आणि भारताने 200 धावांच्या वरचे टार्गेट सेट केले असते. रोहित शर्माने बाऊन्सी खेळपट्टीवर आणि लांब बाऊंड्री असलेल्या मैदानावर लेफ्ट आर्म स्पिनरला स्विप मारण्याचा प्रयत्न केला. तर विराट कोहलीने स्टार्क मधल्या षटकात एकच षटक गोलंदाजी करणार हे माहिती असताना देखील उसळत्या खेळपट्टीवर पूल मारून बसला.

गोलंदाजांच्या बाऊन्सचा वापर

दुसऱ्या बाजूला सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांच्या बाऊन्सचा वापर योग्य प्रकारे करून घेत ऑन द राईज फटक्यांची निवड केली. त्याने बरेच चेंडू हवेत मारले मात्र ते गॅपमध्ये मारले. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर चेंडू खालून मारणे अवघड आहे. सूर्यकुमारने मात्र हे हवेतील फटके अचूक गॅपमध्ये खेळले. त्यामुळे बाद होण्याचा धोका कमी झाला आणि धावा देखील चांगल्या आल्या. अशाच प्रकारे परिस्थीतीशी लवकर जुळवून घेत योग्य फटक्यांची योग्य निवड भारताच्या इतर फलंदाजांना करता आली तर टीम इंडिया प्रत्येक सामन्यात मोठी धावसंख्या उभारून प्रतिस्पर्धी संघावर नक्की दडपण आणू शकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT