Suryakumar Yadav ODI T20 Esakal
क्रीडा

Suryakumar Yadav : सूर्या म्हणतो, हा खेळ असाच; सूर्य उद्या पुन्हा उगवणार

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav ODI T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा 21 धावांनी पराभव केला. यामुळे वनडे मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणाऱ्या भारताला पहिल्यात सामन्यात झटका बसला. पहिल्या वनडे सामन्यात भारताने अनेक चुका केल्या मात्र काही चांगल्या खेळी देखील झाल्या आहेत. विशेष म्हणजे वनडे मालिकेत काळ्या ढगात लुप्त झालेला सूर्य टी 20 मालिकेत पुन्हा तळपणार अशी आशा निर्माण झाली आहे.

भारताचा 360 डीग्री खेळाडू सूर्यकुमार यादवने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात 34 चेंडूत 47 धावांची खेळी केली. भारताची सुरूवात खराब झाली असताना सूर्यकुमार यादवने कर्णधार हार्दिक पांड्याच्या साथीने डावा सावरला होता. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली होती. हे दोघे फलंदाजी करत असताना भारत सामना जिंकणार असे वाटत होते. मात्र सूर्या आणि पांड्या पाठोपाठ बाद झाले अन् भारताच्या विजयाची आशी मावळली.

विशेष म्हणजे वनडे मालिकेत सूर्यकुमारच्या बॅटमधून उत्साहवर्धक अशी खेळी आली नव्हती. त्यामुळे सूर्याच्या फॉर्मला ग्रहण लागले का अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र टी 20 मालिका सुरू होताच सूर्याने आपले तेज दाखवून दिले. याबाबत सूर्यकुमार म्हणाला की, 'वनडे मालिका मला हवी होती तशी गेली नाही. मात्र हे ठिक आहे हा खेळ असाच आहे. वनडे मध्ये उद्या सूर्य पुन्हा उगवणार.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT