Sushant Singh Rajput  
क्रीडा

Sushant Singh Rajput: असं काय घडलं की क्रिकेटचा देव झाला सुशांतच्या बॅटींगचा चाहता

लहान वयात जगाचा निरोप घेतलेल्या सुशांतने भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार माहीचे आयुष्य जवळू पाहिले आहे.

Kiran Mahanavar

On Sushant Singh Rajput's second death anniversary : बॉलीवूड स्टार सुशांत सिंग राजपूत यांचे आजच्या दिवशी २०२० मध्ये निधन झाले. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी सुशांत सिंग यांनी आत्महत्या केली. लहान वयात जगाचा निरोप घेतलेल्या सुशांतने भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार माहीचे आयुष्य जवळू पाहिले आहे. सुशांतने महेंद्रसिंग धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून माहीचे आयुष्य जगले आहे. धोनीच्या बायोपिकसाठी सुशांतने अशी तयारी केली होती की सचिनही त्याचे कौशल्य पाहून थक्क झाला होता.

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरला सुशांत सिंग हा क्रिकेटर आहोत असे वाटायचे. धोनीच्या भूमिकेसाठी सुशांतला तयार करण्याची जबाबदारी भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज किरण मोरे यांच्यावर होती. ते दिवस आठवून मोरे म्हणाले, मी सचिन बरं बोलत होतो. त्याला सांगितले की सुशांत सिंग राजपूत हा एक अभिनेता आहे. त्यावर सचिन बोलतो की, नेटमध्ये खेळताना पाहूण वाटत नाही अभिनेता आहे.

सचिन मुलगा अर्जुनसोबत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आला होता. अर्जुन सुशांतसोबत नेटवर सराव करत होते. ब्रेक दरम्यान सचिन किरण मोरे यांना विचारतो तो मुलगा कोण आहे, मला त्याची फलंदाजी आवडले. महेंद्रसिंग धोनी या चित्रपटासाठी प्रशिक्षण घेत असलेला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत असल्याचे किरण मोरे सचिनला म्हणाले. तितक्यात सचिनला म्हणाला, 'क्या बात करता है'. मी त्याच्या फलंदाजीचा चाहता झालो आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर मोरे त्याने ही घटना शेअर केली होती. मोरे म्हणाले, अर्जुनने सुशांतला गोलंदाजी करायला सुरुवात केली आणि मला विचारले की तो बाऊन्सर टाकू शकतो का? मी होकार दिला आणि मग सुशांतने बाऊन्सरवर शानदार शॉट खेळला. प्रत्येकजण विकेटकीपिंग शिकू शकत नाही, परंतु सुशांत खूप मेहनती आणि गंभीर होता आणि त्याने त्यातही चांगली कामगिरी केली. त्याची फलंदाजी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT