Syazrul Idrus 7 Wickets sakal
क्रीडा

Syazrul Idrus 7 Wickets: 'या' गोलंदाजाने रचला इतिहास, टी20 क्रिकेटमध्ये 7 विकेट घेणारा पहिला खेळाडू अन्…

सकाळ ऑनलाईन टीम

Syazrul Idrus 7 wickets : मलेशियाचा वेगवान गोलंदाज स्याझ्रुल इद्रस याने ट्वेन्टी-२० प्रकारात कमाल केली. सात विकेट (७/८) मिळवणारा तो पहिला गोलंदाज ठरला. ही कामगिरी त्याने चीनविरुद्ध केली.

बायूमास ओव्हल येथे आयसीसीकडून २०२४ च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आशिया विभाग पात्रता- ब ही स्पर्धा सुरू आहे. त्यात मलेशियाच्या इद्रसने हा पराक्रम केला. आयसीसीची अधिकृत स्पर्धा असल्यामुळे हा विक्रम पूर्ण ‘टी-२०’ प्रकारातला आहे.

इद्रसने कमालीची स्विंग गोलंदाजी केली. त्यामुळे चीनचे सर्व फलंदाज त्रिफाळाचीत झाले. इद्रसने हा नवा पराक्रम करताना नायजेरियाच्या पीटर आहोचा विक्रम मोडला. त्याने २०२१ मध्ये सिएरा लिओन विरुद्ध ५ धावांत ६ विकेट अशी कामगिरी केली होती.

पुरुषांच्या टी-२० प्रकारात या अगोदर १२ गोलंदाजांनी एकाच सामन्यात सहा विकेट मिळवण्याची कामगिरी केली आहे. त्यात भारताच्या दीपक चहर आणि युझवेंद्र चहल यांच्यासह ऑस्ट्रेलियाचा अॅस्टोन अॅगर, श्रीलंकेच्या अजांता मेंडिसा यांचा समावेश आहे, पण एकाच गोलंदाजाने सात विकेट मिळवण्याचा पराक्रम इद्रसने साकार केला. त्याच्या या कामगिरीमुळे मलेशियाने हा सामना आठ विकेटने जिंकला.

चीनचा डाव १२ षटकांत २३ धावांत संपुष्टात आला. हे आव्हान मलेशियाने पाच षटकांत दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. पुढील वर्षी वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत संयुक्तपणे होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत पात्रता मिळवण्यासाठी मलेशियासाठी ही उत्तम सुरुवात आहे.

या ‘ब’ श्रेणीतील विजेता संघ आशिया विभागातील मुख्य पात्रता स्पर्धेसाठी पात्र ठरेल. नेपाळमध्ये ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT