Syed Mushtaq Ali T20
Syed Mushtaq Ali T20  sakal
क्रीडा

Syed Mushtaq Ali T20 : मुंबई राष्ट्रीय टी-२० मध्ये प्रथमच अजिंक्य

सकाळ वृत्तसेवा

कोलकाता : सर्वाधिक ४१ वेळा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा विक्रम करणाऱ्या मुंबईने मुश्ताक अली राष्ट्रीय ट्वेन्टी-२० स्पर्धेत प्रथमच अजिंक्यपद मिळवले. अटीतटीच्या सामन्यात हिमाचल प्रदेशचा तीन चेंडू आणि तीन विकेटने पराभव केला.अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने या संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व राखले होते, परंतु आज अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी कडवी झुंझ द्यावी लागली. तनुष कोटियनची अष्टपैलू चमक महत्त्वाची ठरली.

मुंबईने हिमाचल प्रदेशची ६ बाद ५८ अशी अवस्था केली होती; मात्र त्यानंतरही त्यांनी २० व्या षटकापर्यंत १४३ धावांपर्यंत मजल मारली. मुंबई संघात अनेक आयपीएल स्टार आहेत, तरीही त्यांची ७ बाद ११९ अशी अवस्था झाली होती, परंतु सर्फराझ खान आणि कोटियन यांनी विजय खेचून आणला.महत्त्वाच्या क्षणी जीवदान मिळालेल्या सर्फराझने ३६ धावांची खेळी केली, परंतु पाच चेंडूत एका षटकारासह ९ धावा करणाऱ्या कोटियनने ठसा उमटवला. अखेरच्या चार चेंडूत चार धावांची गरज असताना कोटियनने षटकार ठोकला. तत्पूर्वी त्याने गोलंदाजीत १५ धावांत तीन विकेट मिळवले होते. सर्फराझ आणि कोटियन यांनी १२ चेंडूत २३ धावांची गरज असताना हा सामना फिरवला.

पृथ्वी शॉ ११ धावांवर बाद झाल्यानंतर रहाणे पंचांच्या चुकीचा निर्णयाचा बळी ठरला. फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरने ३४; तर यशस्वी जयस्वालने २७ धावांची खेळी करूनही विजय मुंबईपासून दूर होत चालला होता.तत्पूर्वी मुंबईने नाणेफेक जिंकून हिमाचल प्रदेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मोहित अवस्थीने आपल्या पहिल्याच षटकांत हिमाचल प्रदेशला पहिला धक्का दिला, त्यानंतर मोहित आणि तनुष कोटियन यांनी हिमाचल प्रदेशची ६ बाद ५८ अशी दाणादाण उडवली.

हिमाचल प्रदेशला शतकी धावाही करणे कठीण जाणार असे वाटत असताना अक्ष वशिष्ठ आणि इकांत सेन यांनी किल्ला लढवला. १४३ धावांची समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.

संक्षिप्त धावफलक : हिमाचल प्रदेश २० षटकांत ८ बाद १४३ (निखिल गंता २२- १४ चेंडू, ४ चौकार, अक्ष वशिष्ठ २५- २२ चेंडू, ३ चौकार, इकांत सेन ३७- २९ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, मयांक डागर नाबाद २१- १२ चेंडू, २ चौकार, १ षटकार, मोहित अवस्थी ४-०-२१-३, शिवम दुबे २-०-१६-१, तनुष कोटीयन ४-०-१५-३). पराभूत वि. मुंबई ः १९.३ षटकांत ७ बाद १४६ (पृथ्वी शॉ ११, रहाणे १, यशस्वी जयस्वाल २७- २८ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, श्रेयस अय्यर ३४- २६ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, सर्फराझ खान नाबाद ३६- ३१ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, तनुष कोटियन नाबाद ९- ५ चेंडू, १ षटकार, वैभव अरोरा ४-०-२७-३, रिषी धवन ३.३-०-२६-२, मयांक डागर ४-०-२४-२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

MS Dhoni : MS धोनीमुळे हरली CSK? 'या' मोठ्या चुकीमुळे प्लेऑफचे तिकीट गेलं हातातून

Nancy Tyagi: 30 दिवस, 1000 मीटर कापड अन् 20 किलो वजन; कान चित्रपट महोत्सवात परिधान केला स्वत: शिवलेला ड्रेस, नॅन्सी त्यागी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT