Tamil Nadu vs Hyderabad  Twitter
क्रीडा

Syed Mushtaq Ali Trophy : हैदराबाद आउट; तामिळनाडूनं गाठली फायनल!

तामिळनाडूचा कर्णधार विजय शंकरने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

सुशांत जाधव

Syed Mushtaq Ali Trophy 2021 22 : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये तामिळनाडूनं धमाकेदार विजय नोंदवला. हैदराबादच्या संघाला 8 गडी आणि 34 चेंडू राखून पराभूत करत त्यांनी फायनल गाठली. तामिळनाडूचा कर्णधार विजय शंकरने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तामिळनाडूचा मध्यम गती गोलंदाज पी सरवना कुमार (P Saravana Kumar) च्या माऱ्यासमोर हैदराबादच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. 32 वर्षीय गोलंदाजाने 3.3 षटकात 2 निर्धाव षटके टाकत 21 धावा खर्च करून अर्धा संघ तंबूत पाठवला.

हैदराबादच्या तनय थंगराजन (Tanay Thyagarajan) याने 24 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने केलेल्या 25 धावा ही हैदराबादची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या हैदराबादचा संघ 18.3 षटकात 90 धावांतच गारद झाला.

हैदराबादने दिलेल्या 91 धावांचा पाठलाग करताना तामिळनाडूची सुरुवातही खराब झाली. यष्टीरक्षक फलंदाज अवघ्या एका धावेची भर घालून बाद झाला. सलामीवीर हरिश निशांथलाही संघाच्या धावसंख्येत 14 धावांचीच भर घालता आली. सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर कर्णधार विजय शंकर आणि साई सुदर्शन यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. साई सुदर्शनने (Sai Sudharsan) 31 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने नाबाद 34 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला विजय शंकरने (Vijay Shankar) 40 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 43 धावांची नाबाद खेळी केली.

तामिळनाडू फायनलमध्ये कोणाविरुद्ध भिडणार?

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर कर्नाटक आणि विदर्भ यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना खेळवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारच्या सत्रात होणाऱ्या या सामन्यात विजेता फायनलसाठी पात्र ठरेल. यातील विजेता आणि तामिळनाडू यांच्यात सोमवारी 22 नोव्हेबरला फायनल सामना रंगेल. हा सामना देखील अरुण जेटली स्टेडियवरच नियोजित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

Latest Marathi News Updates: तासगांव तालुक्यातील पेड गावात बिबट्या कोंबड्या खायला गेला आणि खुराड्यात अडकला

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

MP Dhairyasheel Patil: उजनी प्रदूषणाबाबत केंद्र सकारात्मक, राज्य शासन उदासीन: खासदार धैर्यशील मोहिते-पाटील;'आगामी निवडणुका मविआ एकत्रितच लढणार'

Ayush Komkar प्रकरण पोलिसांची मोठी कारवाई, पण मास्टरमाईंड अजूनही फरार..| Andekar Toli | Sakal News

SCROLL FOR NEXT