Carlos Brathwaite  File Photo
क्रीडा

T-20 : स्पर्धेदरम्यान कॅरेबियन अष्टपैलूला कोरोना

टी-20 ब्लास्टच्या यंदाच्या हंगामात ब्रेथवेटनं 9 सामन्यात 13.33 च्या सरासरीने आणि 7.53 च्या इकॉनमीने 18 विकेट घेतल्या आहेत.

सुशांत जाधव

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी-20 स्पर्धेदरम्यान कोरोनाच्या केस समोर येत आहेत. इंग्लंडमधील टी-20 ब्लास्ट स्पर्धेत सहभागी असलेल्या कॅरेबियन अष्टपैलू कार्लोस ब्रेथवेट (Carlos Brathwaite) याला कोरोनाची लागण झालीये. टी-20 ब्लास्टच्या यंदाच्या हंगामात ब्रेथवेटनं 9 सामन्यात 13.33 च्या सरासरीने आणि 7.53 च्या इकॉनमीने 18 विकेट घेतल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वलस्थानी होता. 30 जून रोजी यॉर्कशायर विरुद्धच्या मॅचमध्ये ब्रेथवेट मॅन ऑफ द मॅच ठरला होता. या सामन्यात त्याने 2 ओव्हरमध्ये 7 धावा खर्च करुन 3 विकेट घेतल्या होत्या. (T20 Blast West Indies Cricketer Carlos Crathwaite Tests Positive For Covid 19)

वार्विकशायर संघाकडून मागील सामन्यात तो मैदानात उतरल्याचे दिसला नाही. नॉटिंघमशायर विरुद्धच्या सामन्यात संघाला ब्रेथवेटची उणीव चांगलीच जाणवली. त्यानंतर आता कोरोनामुळे तो संघाबाहेरच पडलायय.

T20 ब्लास्ट स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात समावेश

कॅरेबियन अष्टपैलूने आपल्या संघाकडून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेतच याशिवाय स्पर्धेतही त्याने विशेष छाप सोडलीये. अफगाणिस्तानच्या नवीन उल हक याच्यानंतर सर्वाधिक विकेट घेणारा स्पर्धेतील तो दुसरा गोलंदाज आहे. नवीन उल हकने या स्पर्धेत 21 विकेट घेतल्या आहेत. ब्रेथवेटने 18 विकेटसह फलंदाजीत 104 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT