Namibia players celebrate their historic T20 victory over South Africa after winning by four wickets.

 

esakal

क्रीडा

Namibia beat South Africa: आरारारारा...खतरनाक! नामिबियाने चक्क दक्षिण आफ्रिकेला केलं पराभूत; क्रिकेटमध्ये घडवला नवा इतिहास

Namibia creates history by defeating South Africa : दक्षिण आफ्रिकेने विकेट गमावून दिलेलं धावांचं लक्ष्य नामिबायाने अवघ्या सहा विकेट गमावूनच केलं गाठलं

Mayur Ratnaparkhe

Namibia vs South Africa T20 : आजकालच्या क्रिकेटमध्ये कधी काय पाहायला मिळेल काहीच सांगता येणार नाही. एखादा अतिशय कमकुवत संघ देखील बलाढ्य अशा संघालाही पराभूत करण्याची क्षमता ठेवतोय. खरंतर याआधीही आपण अनेक अशी उदाहरण बघितली आहेत. परंतु आज नामिबिया क्रिकेट संघाने जी काय कामगिरी केली आहे, तिचे खरोखरच अभूतपूर्व असेच वर्णन होईल.

२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी अलीकडेच पात्र ठरलेल्या नामिबिया या नवख्या संघाने आपल्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवून नवा इतिहास घडवला आहे.  झेन ग्रीनने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला एक अविश्वसनीय विजय मिळवून दिला, जो कायम स्मरणात राहील. प्रथम फलंदाजी करताना, दक्षिण आफ्रिकेने आठ बाद १३४ धावा केल्या, ज्या नामिबियाने सहा विकेट्स गमावून पूर्ण केल्या. यामध्ये झेन ग्रीन ३० आणि रुबेन ट्रम्पेलमन ११ धावांवर नाबाद राहिले.

होय, कुणालाही आधी विश्वास बसणार नाही अशीची ही बातमी आहे, परंतु ही वस्तूस्थिती आहे. खरंतर नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कोणत्या प्रकारातील हा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता. ज्यामध्ये नामिबियाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

खरंतर, दक्षिण आफ्रिका संघाचे जवळजवळ सर्व प्रमुख खेळाडू या सामन्यासाठी अनुपलब्ध होते, कारण दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना उद्या (रविवार, १२ ऑक्टोबर) लाहोरमध्ये सुरू होत आहे. परिणामी दक्षिण आफ्रिकेचा बी किंवा सी संघ या एकमेव टी-२० सामन्यासाठी नामिबियात पोहोचला होता. मात्र काहीजरी असलं तरी क्रिकेटमध्ये अनुभवी देश असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला तुलनेत दुबळ्या नामिबियाने पहिल्याच सामन्यात पराभूत केलं याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli News : शिंदेंनी फिरविला राजकीय पट; कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेला मनसेची साथ

Crime News : नोकरीच्या शोधात असलेल्या 19 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीचा निर्घृण खून; आमदाराच्या डेरीजवळ आढळला मृतदेह

Pune Grand Tour Viral Video: स्पर्धेत उतरू दिलं नाही… तरी सोशल मीडियावर पुणे ग्रँड टूरचे खरे विजेते ठरलेले व्हायरल आजोबा कोण?

Latest Marathi News Live Update : भारत न्यूझीलँड टी-20 सामन्यादरम्यान वर्धा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

China Population Decline : चीनची लोकसंख्या कमालीची घटली, अर्थव्यवस्था धोक्यात, महासत्ता होण्याचे स्वप्न राहणार अपूर्ण ?

SCROLL FOR NEXT