U-19 Women T20 World Cup IND vs SL 
क्रीडा

T20 WC IND vs SL: टीम इंडियाच्या सेमीफायनलमध्ये आशा जिवंत! लंकेला चारली पराभवाची धूळ

Kiran Mahanavar

U-19 Women T20 World Cup IND vs SL : महिला अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने मोठा विजय मिळवला आहे. त्यांच्या शेवटच्या सुपर-6 सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 20 षटकांत केवळ 59 धावाच करू शकला. भारतीय महिला संघाने 8 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत कायम आहे.

भारतीय महिला संघासाठी गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेला पहिला धक्का बसला. यानंतर संघाचा संघर्ष सुरूच राहिला. 20 षटकात त्याने 9 गडी गमावून 59 धावा केल्या. संघाकडून कर्णधार विश्मी गुणरत्नेने सर्वाधिक 25 धावा केल्या. 5व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या उमय रत्नायकेने 36 चेंडूत 13 धावा केल्या. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला 10 चा आकडा गाठता आला नाही. भारताकडून पार्श्वी चोप्राने 4 षटकात 5 धावा देत 4 विकेट घेतल्या तर मन्नत कश्यपने 2 घेतल्या.

भारतीय कर्णधार शफाली वर्माने एक षटकार आणि एक चौकार मारला पण 10 चेंडूत 15 धावा करून ती बाद झाली. रिचा घोषही चांगली कामगिरी करू शकली नाही, पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बाद झाली. चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या सौम्या तिवारीने धडाकेबाज खेळी केली. सौम्याने 15 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या. या खेळीत 5 चौकारांचा समावेश होता. त्याने संघाला 7.2 षटकांत लक्ष्य गाठले. या विजयासह टीम इंडियाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: बोटाला दुखापत झालेल्या शुभमन गिलचं मैदानात कमबॅक, आता पहिल्या कसोटीत खेळणार?

एकीकडे सुरु होती सर्जरी आणि दुसरीकडे गाणं गात होता सोनू निगम, संगीतावर प्रेम असावं तर असं! viral video

Thane News: ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मालमत्ता कर तसेच टीएमटीचे तिकीट दरवाढ करण्याचा प्रस्ताव

मला मराठ्यांपासून लांब ठेवण्याचा पूर्वनियोजित कट; मनोज जरांगे आक्रमक, सरकारवर सडकून टीका

Marathi News Live Updates : माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, गाडीवर चिखल, पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या

SCROLL FOR NEXT