T20 World Cup 2021 esakal
क्रीडा

T20 World Cup 2021 : भारतीय संघातील फलंदाजांचे अपयश

सराव सामन्यात पश्‍चिम ऑस्ट्रेलियाचा ३६ धावांनी विजय

सकाळ वृत्तसेवा

पर्थ : पहिल्या सराव सामन्यात विजय संपादन करीत टी-२० विश्‍वकरंडकाआधी कसून सराव करणारा भारतीय क्रिकेट संघ येथे झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात पराभूत झाला. पश्‍चिम ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघाने भारतीय संघावर ३६ धावांनी विजय साकारला. के. एल. राहुलच्या ७४ धावांच्या खेळीला विजयाचा टिळा लागला नसला, तरी त्याने फलंदाजीचा सराव करवून घेतला; मात्र भारताचे इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले.

१६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीयांची सुरुवात संथ झाली. राहुलसोबत रिषभ पंत याला सलामीला पाठवण्यात आले. जेसन बेहरनडोर्फ व मॅथ्यू केली यांनी अचूक टप्प्यात प्रभावी गोलंदाजी केली. बेहरनडोर्फच्या गोलंदाजीवर पंत आक्रमक फटकेबाजी करायला गेला आणि ९ धावांवर निक हॉब्सनकरवी झेलबाद झाला. दीपक हुडाला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली, पण लान्स मॉरीसने त्याला ६ धावांवरच बाद केले. अँड्रयू टे राहुलला ७४ धावांवर बाद केले आणि भारताचे विजयाचे दार बंद केले. राहुलने आपल्या खेळीत ९ चौकार व २ षटकार मारले. भारताला ८ बाद १३२ धावा करता आल्या. याआधी रवी अश्‍विने ३ बळी टिपले. तसेच रोहित शर्मा व विराट कोहली हे फक्त क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरले.

संक्षिप्त धावफलक

पश्‍चिम ऑस्ट्रेलिया - २० षटकांत ८ बाद १६८ धावा (डाअर्सी शॉर्ट ५२, निक हॉब्सन ६४, रवीचंद्रन अश्‍विन ३/३२) विजयी वि. भारत २० षटकांत ८ बाद १३२ धावा (के. एल. राहुल ७४, लान्स मॉरीस २/२३).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT