T20 World Cup 2022 Gulbadin Naib rolls on pitch without
T20 World Cup 2022 Gulbadin Naib rolls on pitch without  sakal
क्रीडा

T20 World Cup : अफगाणी खेळाडू क्रिकेट खेळत होता की कबड्डी; रन आऊटचा VIDEO Viral

सकाळ ऑनलाईन टीम

T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषकाचा 32 वा सामना ब्रिस्बेनमध्ये आज अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने 20 षटकांत आठ गडी बाद 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 18.3 षटकांत 4 बाद 148 धावा करून सामना जिंकला.

श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान क्रिकेट इतिहासातील सर्वात दुर्दैवी रनआउट झाला. अफगाणिस्तानचा फलंदाज गुलबदीन नैब क्रीझवर पोहोचण्यासाठी डायव्ह करू शकला नाही, त्यानंतर तो रोल करून क्रीजच्या आत जाण्याचा प्रयत्न करत होता. हा व्हिडिओ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अधिकृत इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या डावातील हे 18 वे षटक होते आणि महिष तेक्षाना श्रीलंकेसाठी गोलंदाजी करत होता.

मोहम्मद नबीने मिडविकेटच्या भागात शॉट खेळला. नॉनस्ट्रायकरच्या टोकाला उभा असलेल गुलबदीन नैबही धावण्यासाठी धावला. दोन्ही फलंदाजांनी पहिली धाव पूर्ण केली, पण दुसरी धाव गुलबदीन नैब पडला, त्याला सावरायलाही वेळ नव्हता नैबच्या हातातून बॅट पडली. त्यामुळे तो मैदानावर लोळण घालत क्रीजच्या आत पोहचवण्याचा प्रयत्न करत होता. कबड्डीत जसा रेडर हा मध्यरेषेला स्पर्श करण्यासाठी धडपडत असतो तसा नैब देखील धडपडत होता. त्यामुळे क्रिकेटच्या सामन्यात कबड्डीचा थरार देखील पहावयास मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

Mumbai Lok Sabha: मुंबईत मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने? ठाकरेंना होणार फायदा?

Rohit Sharma Hardik Pandya : पुढच्या हंगामात रोहित अन् हार्दिक दोघांना मिळणार नारळ? भारताच्या दिग्गजाला म्हणायचं तरी काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

SCROLL FOR NEXT