t20 world cup 2022 kl rahul
t20 world cup 2022 kl rahul  sakal
क्रीडा

IND vs AUS : सराव सामन्यात KL राहुलचा तुफानी ट्रेलर, 27 चेंडूंत ठोकल्या 50 धावा

Kiran Mahanavar

T20 World Cup 2022 : टीम इंडिया 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळत आहे. सराव सामन्यात टीम इंडियाच्या केएल राहुलने आपल्या फलंदाजीचा तुफानी ट्रेलर संपूर्ण जगाला दाखवला आहे. राहुलने या सराव सामन्यात फलंदाजाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धुव्वा उडवला. केएल राहुलने स्पष्ट केले आहे की, जेव्हा टी-20 विश्वचषकाचे मुख्य सामने येतात त्यासाठी सज्ज आहे.

टीम इंडियाचा स्टार ओपनिंग बॅट्समन केएल राहुलने टी-20 वर्ल्डकपच्या सराव सामन्यात 27 चेंडूत झंझावाती अर्धशतक ठोकले. केएल राहुलने या सामन्यात 33 चेंडूत 57 धावांची स्फोटक खेळी खेळली. ज्यात 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल ही जोडी टीम इंडियासाठी सलामीला आली. रोहित शर्मा संथ फलंदाजी करत असताना दुसरीकडे केएल राहुल आपल्या फलंदाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना घाबरवत होता. केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी 7.3 षटकात 78 धावांची सलामी दिली. गुरुवारीच केएल राहुलने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात 74 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. राहुलचा फॉर्म एक प्रकारे भारतीय चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. केएल राहुलने एकदा त्याचा वेग पकडला की त्याला रोखणे फार कठीण असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT