T20 World Cup 2022 NED raise hopes of huge upset SA  sakal
क्रीडा

T20 WC : ग्रुप-2 मध्ये हे काय घडलं! चोकर्स नेदरलँडकडून हरले, पाकिस्तान मध्ये दिवाळी

पाकिस्तान के मन मे लड्डू फुटे; चोकर्स नेदरलँड कडून हरले

Kiran Mahanavar

T20 World Cup 2022 : दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात अॅडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नेदरलँड्स संघाने मोठा धुव्वा उडवला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदरलँड संघाने निर्धारित षटकांत चार गडी गमावून १५८ धावा केल्या. त्याचवेळी लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ निर्धारित षटकांत 8 गडी गमावून 145 धावांवर थांबला. अशाप्रकारे नेदरलँड संघाने शेवटच्या सामन्यात 13 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.

या विजयासह आधीच बाहेर पडलेल्या नेदरलँड्स संघाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतून बाहेर काढले. यासोबतच भारतीय संघ 6 गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आता पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना जिंकणारा संघ गट-2 मधून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 21 धावावर पहिला धक्का बसला. त्यानंतर ठराविक अंतरावर विकेट पडत राहिल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला षटकात 8 गडी गमावून 145 धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून रिले रुसोने सर्वाधिक 25 धावांची खेळी खेळली. याशिवाय हेनरिक क्लासने 21 आणि टेंबा बावुमाने 20 धावा केल्या.

तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने 4 विकेट गमावून 158 धावा केल्या. स्टीफन मायबर्ग आणि मॅक्स ओ'डौड यांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. नेदरलँड्सकडून कॉलिन अकरमनने 41 धावा केल्या. याशिवाय स्टीफन मायबर्गने 30 चेंडूत 37 धावा, टॉम कूपरने 19 चेंडूत 35 धावा आणि औदौडने 31 चेंडूत 29 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने दोन, एनरिक नोरखिया ​​आणि एडन मार्करामने प्रत्येकी एक विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT