ICC T20 World Cup UAE vs NED sakal
क्रीडा

T20 WC 2022 : रोमांचक सामन्यात शेवटच्या षटकात नेदरलँड्सने UAE चा केला पराभव

नेदरलँड्सने 2022 टी-20 विश्वचषक पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात UAE चा तीन गडी राखून पराभव केला.

Kiran Mahanavar

ICC T20 World Cup UAE vs NED : आयसीसी टी-20 विश्वचषकाला धमाकेदार सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दोन जोरदार सामने पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा नामिबियाविरुद्ध दारूण पराभव झाला, तर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात नेदरलँड्सने यूएईचा पराभव केला. बास डेलिडेच्या घातक गोलंदाजीसमोर यूएईचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 111 धावांपर्यंत मजल मारू शकला. नेदरलँड्सने ही धावसंख्या 19.5 षटकांत 7 गडी गमावून पूर्ण केली. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने 16 धावांची नाबाद खेळी खेळली.

गिलॉन्गच्या सिमंड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सने यूएईचा 3 गडी राखून पराभव केला. दोघांमधील हा सामना खूपच रोमांचक झाला. शेवटच्या षटकात सामन्याचा निर्णय लागला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या UAE संघाला 20 षटकात 111 धावा करता आल्या. यूएईकडून मोहम्मद वसीमने 41 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकला नाही. नेदरलँड्सकडून बास डी लीने 3 बळी घेतले.

112 धावांचा पाठलाग करताना नेदरलँडलाही हे लक्ष्य गाठण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. नेदरलँड्सने हे लक्ष्य सामन्याच्या शेवटच्या षटकात गाठले. नेदरलँड्सकडून मॅक्सोडने 23 धावा केल्या, तर शेवटी कर्णधार स्कॉट एडवर्डने 16 धावांची मौल्यवान खेळी केली. त्याने सामन्याच्या टर्निंग पॉइंटवर टीम पिंगलसोबत 27 धावांची भागीदारी केली आणि सामना नेदरलँड्सच्या दिशेने नेला. दुसरीकडे जुनैद सिद्दीकीने यूएईकडून शानदार गोलंदाजी करताना 3 बळी घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani 5700 Crore Project : अदानींचा आणखी एक ५ हजार ७०० कोटींचा प्रकल्प थेट ५६ कोटी दाखवला; नागपूरच्या जंगलाचा होणार ऱ्हास, काँग्रेसने केला थेट आरोप

Air Pollution: उत्तर भारतावर प्रदूषणाची चादर, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खालावली; पाहा आजचे AQI

Honey Trap: आधी मैत्री, मग जवळीक अन् नंतर प्रेमाचं जाळं! हेरगिरीसाठी कसा केला जातो 'हनी ट्रॅप'चा वापर?

Latest Marathi News Live Update: दिवाळीची सुट्टी अन् विकेंडमुळे कोकण प्रवाशांची मोठी गर्दी; मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ वाहतुकीची प्रचंड कोंडी

Investment Fraud: वीस दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष ;गोव्यातील कॅसिनोमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक

SCROLL FOR NEXT