t20 world cup 2022 prize money winner team sakal
क्रीडा

T20 World Cup : 'चॅम्पियन' टीमवर पैशांचा पाऊस तर उपविजेत्या टीमही होणार मालमाल

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 6 दिवसांनंतर क्रिकेट जगताला नवा चॅम्पियन मिळणार आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

T20 World Cup 2022 Prize Money Winner Team : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 6 दिवसांनंतर क्रिकेट जगताला नवा चॅम्पियन मिळणार आहे. टी-20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना रविवारी 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. भारत, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे संघ 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.

भारत, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तानमधील कोणताही एक संघ रविवारी 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर टी-20 विश्वचषक 2022 ची ट्रॉफी उचलेल. टी-20 विश्वचषक 2022 ची ट्रॉफी जिंकण्याबरोबरच यावेळी विजेत्या संघावर पैशांचा पाऊसही पडणार आहे. एवढेच नाही तर पराभूत संघाला म्हणजेच अंतिम फेरीत उपविजेत्या संघालाही मोठी रक्कम मिळेल.

टी-20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद जिंकणाऱ्या चॅम्पियन संघाला 1.6 दशलक्ष यूएस डॉलर्स म्हणजेच तब्बल 13 कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला याच्या निम्मी रक्कम मिळणार आहे. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना 4-4 लाख अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळेल.

टी-20 वर्ल्डकप कोणाला किती रक्कम मिळणार -

  • विजेता- 13 कोटी

  • उपविजेता- 6.42 कोटी

  • सेमीफायनल- 3.26 कोटी

  • सुपर-12 मधील विजय- 32 लाख

  • सुपर-12 मधून बाहेर होणारे- 57 लाख

  • पहिल्या फेरीतील विजय- 32 लाख

  • पहिल्या फेरीतून बाहेर होणारे- 32 लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT