T20 World Cup team india  sakal
क्रीडा

T20 World Cup: रोहित शर्मा अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला रवाना, 15 वर्षांचा दुष्काळ संपणार!

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आगामी टी-20 विश्वचषक-2022 साठी गुरुवारी सकाळी ऑस्ट्रेलियाला रवाना झाली

Kiran Mahanavar

T20 World Cup Team India : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आगामी टी-20 विश्वचषक-2022 साठी गुरुवारी सकाळी ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड देखील दिसत आहेत. रोहित शर्मा अँड कंपनीकडून यावेळी आशा आहेत की ते 15 वर्षांचा दुष्काळ संपवतील.

भारतीय संघाने शेवटचा टी-20 विश्वचषक 2007 साली जिंकला होता. तेव्हा संघाची कमान महेंद्रसिंग धोनीकडे होती. आता रोहित शर्माकडून खूप अपेक्षा आहेत. फोटो शेअर करताना बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले, 'पिक्चर परफेक्ट. 16 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. मात्र टीम इंडिया आपला पहिला सामना 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. नुकतेच आशिया कप-2022 मध्येही दोन्ही संघ आमनेसामने आले होते.

भारतीय संघाला टी-20 विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळायची आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवन संघाचे नेतृत्व करणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 6 ऑक्टोबर रोजी लखनौ येथे खेळवला जाणार आहे. यानंतर, इतर दोन सामने रांची आणि दिल्ली येथे 9 आणि 11 ऑक्टोबर रोजी होतील.

  • ICC T20 विश्वचषकासाठी असा असणार भारतीय संघ:

    रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

  • राखीव खेळाडू

    मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT